Eknath Shinde on Maharashtra CM : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. यात महायुतीला बहुमत मिळालेलं आहे. आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत चर्चा होत आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक विधान केलं आहे. वाचा सविस्तर…

एकनाथ शिंदे काय म्हणाले?
सगळ्यांचा सुपडा साफ झालाय. विरोधी पक्षनेता होवू शकतं नाही. मोठा विजय आपल्याला मिळालेला आहे. आपले थोड्या मतांनी पडलेलं आहेत. आज 67 वर गेलो असतो. काही आपल्या निवडणुन येण्याचा स्ट्राइक रेट जनतेनं आपल्याया आशीर्वाद दिला. आपल्याला आणखी वाढवायचं आहे. निवडणून आले त्यांना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्रिपदाबाबत सध्या काम सुरू आहे. महायुती एकसंघ आहे. महायुतीत वितूष्ट येईल असं कुठलंही वक्तव्य कुणीही करू नका, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
शिंदेंची गटनेते पदी एकमताने निवड
शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सर्व 57 आमदारांची मुंबईतील ताज लँडमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत चार ठराव मंजूर झाले. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी एकमताने निवड झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आमदारांना संबोधित केलं. लाडक्या बहिणीचा विजय असो… तुमचं स्वागत करतोय. लाडक्या बहिणींनी इतिहास घडवलं आहे. आपण विकासाचं काम तसेच कल्याणकारी काम आहे. यात लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली. बहीण लडकी आणि विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. काही लोकं फिट येऊन पडले. लाडक्या बहिणीमुळे विजय मिळवला आहे. विरोधी पक्षाकडे संख्याबळ देखील राहिलं नाही. सगळा सुपडासाफ केला आहे. हे सरकार सर्व सामान्य जनतेचं आहे, असं शिंदे म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. खरी शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिले आहे. प्रत्येकालाच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असतं. मात्र कोण मुख्यमंत्री होणार हा विषय वरिष्ठांचा आहे. वरिष्ठांमध्ये चर्चा होऊन हे एकमत होईल आणि उद्या संध्याकाळपर्यंत कळेल, असं शिरसाट म्हणालेत.