मुंबई : राजकारणातील अनेक घराण्यांमध्ये पक्षापलिकडचे स्नेहसंबंध आहेत. मुंडे, महाजन, ठाकरे, पवार या बड्या राजकीय परिवारांमध्ये असाच ओलावा दिसून येतो. महाजन आणि ठाकरे कुटुंबातील नातं फार जुनं आहे. भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे संबंध पुढच्या पिढीतही जपले आहेत. नुकतंच एका मुलाखतीत पूनम महाजन यांनी भाजपने तिकीट कापल्यावर उद्धव दादालाही त्रास झाला, आमचं फोनवर बोलणं झालं, असं सांगितलं. तर उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेही प्रेमळ असून त्यांच्याशी घरच्या गप्पा होत असल्याचं पूनम म्हणाल्या.
पूनम महाजन काय म्हणाल्या?
ठाकरे आणि महाजन यांच्यात हे कौटुंबिक नातं आहे. जेव्हा २०२४ मध्ये मला तिकीट मिळताना अडचणी आल्या. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक भाषणात किंवा मुलाखतीत या गोष्टीचा उल्लेख केला, की पूनमसोबत हे व्हायला नको होतं. एक राजकारण असतं आणि राजकारणात नात्यांची एक वीण असते, मी प्रत्येक ठिकाणी पाहिली आहे, असं पून महाजन म्हणत होत्या.
बड्या नेत्यांकडून प्रेम
संसदेत मी पाहिलं आहे, मुलायमसिंह यादव जेव्हा भेटत, म्हणायचे की अरे आपल्या प्रमोदची मुलगी आली आहे. मी त्यांचे चरणस्पर्श करत असे, तेव्हा ते मायेने डोक्यावरुन हात फिरवायचे. फारुक अब्दुल्ला तर विलक्षण प्रेम करायचे. शरद पवार यांचाही माझ्यावर जीव आहे. मला कधीच प्रेमाची कमतरता जाणवली नाही, असं पूनम महाजन एक-एक करुन सांगू लागल्या.
उद्धव ठाकरे यांच्याशी फोन होतच असतो.
रश्मी ठाकरेंसोबत माझं नेहमी हितगूज होत असतं. त्यांच्याशी माझे जवळचे संबंध आहेत आणि त्या खूप प्रेमळ आहेत. तिकीट कापल्यानंतर वेगळा फोन येण्याचा प्रश्न नव्हता. कारण आमचं सारखं बोलणं होतच असतं. आमच्या बोलण्यात घरातले विषय असतात, राजकारण नसतं. मी उद्धव ठाकरेंना दादा म्हणते. आमचं वन्यजीव विषयावर बोलणं होतं. आयुष्य, वारसा आणि कॉफी.. कॉफीवर आमच्या बऱ्याच गप्पा रंगतात, असं पूनम यांनी सांगितलं.
Author: VS NEWS DESK
pradeep blr