अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना आऱाध्या ही मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. या दोघांनी ‘दसवी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या 51 व्या वाढदिवशी पती अभिषेक आणि बच्चन कुटुंबीयांकडून शुभेच्छांची कोणतीच पोस्ट न दिसल्याने पुन्हा एकदा या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. एरव्ही बिग बीसुद्धा सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित असतात. मात्र सुनेच्या वाढदिवशी मात्र त्यांनी कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. याउलट काही दिवसांपूर्वीच बिग बींच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने मात्र त्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली होती. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या तिच्या आणि अभिषेकच्या नात्यात येणाऱ्या आव्हानांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी 2007 मध्ये लग्नगाठ बांधली. 16 नोव्हेंबर 2011 रोजी ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. आराध्या आता 13 वर्षांची होणार आहे. ऐश्वर्या नुकतीच मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात झळकली होती. दोन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि दोन्ही भागात ऐश्वर्याने दमदार भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला पुरस्कारसुद्धा मिळाला होता. तर दुसरीकडे अभिषेकचा ‘आय वाँट टू टॉक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक ‘पिकू’ फेम शूजित सरकार करत आहे.
Author: VS NEWS DESK
pradeep blr