Search
Close this search box.

मनोज जरांगेंचा युटर्न कोणाच्या पथ्यावर? कोणाला फायदा कोणाला तोटा जाणून घ्या

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला. आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

मनोज जरांगेंचा युटर्न कोणाच्या पथ्यावर? कोणाला फायदा कोणाला तोटा जाणून घ्या
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला. आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत असं आवाहनही केलं.मनोज जरांगे पाटील यांनी अचानक घेतलेल्या या युटर्नमुळे महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीचंच टेन्शन अधिक वाढल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा करताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, आम्ही मुस्लिम आणि दलित समाजामधील उमेदवारांची यादी मागितली होती. मात्र ती आम्हाला प्राप्त झाली नाही. एकट्या जातीच्या बळावर कुठलीही निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत.

मनोज जरांगे पाटील यांच्या माघारीचा फायदा कोणाला?

मनोज जरांगे पाटील यांचा सर्वाधिक प्रभाव हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी भाजपला टार्गेट केलं होतं. याचा मोठा फटका हा भाजपला बसला. मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत, त्यातील तब्बल सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील जरांगे फॅक्टर चालल्याचं पहायला मिळालं. सोलापूर, माढा, अहमदनगर यासारख्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला.दरम्यान जर जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिले असते तर मराठा, मुस्लिम आणि दलित मतांचं विभाजन झालं असतं. त्याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीला बसला असता. मात्र जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं आता मुस्लिम आणि दलित मतदान हे महाविकास आघाडीलाच होण्याची शक्यता आहे. याचा फटका हा महायुतीला बसू शकतो.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मंजूर केली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर जरांगे पाटील ठाम होते. मात्र जरांगे पाटील यांची ही मागणी काही मान्य झाली नाही. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बैद्ध, मुस्लिम आणि मराठा आशी मोट बांधण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज ऐनवेळी विधानसभा निवडणुकीतून आपण माघार घत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र आता असा प्रश्न निर्माण होतो की याचा सर्वात जास्त फायदा कोणाला होणार महाविकास आघाडी की महायुती, मात्र दुसरीकडे असंही दिसून येते की जरांगे फॅक्टर आधीच ओळखून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनेक मतदारसंघात मराठा उमेदवारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.  जरांगे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा कोणाला फायदा होणार हे आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.
VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು