Search
Close this search box.

मुंबईत 25 जागांवर राज ठाकरेंचे उमेदवार, कुठे-कुठे होणार शिंदे विरुद्ध मनसे लढत?

मुंबईतील ३६ मतदारसंघात जोरदार लढत रंगणार आहे. महाविकासआघाडी आणि भाजप-शिंदे गटातील आधीच तीव्र लढत होणार असून मनसेनेही मुंबईत उमेदवार दिले आहेत. यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मुंबईत 25 जागांवर राज ठाकरेंचे उमेदवार, कुठे-कुठे होणार शिंदे विरुद्ध मनसे लढत?
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु होताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. मुंबईतील काही जागांवर महायुती विरुद्ध महाविकासाआघाडी, तर काही महायुती विरुद्ध महाविकासआघाडी विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

36 पैकी 25 जागांवर मनसेचे उमेदवार

मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 25 जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार घोषित केले आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक उमेदवार लढवणार असल्याचे सांगितले होते. मनसेने मुंबईतील 25 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. यामुळे महायुतीत अस्वस्थता पाहायला मिळत आहे. मनसेने मुंबईतील विधानसभेच्या 36 पैकी 25 जागांवर निवडणूक लढवत असल्याने या सर्व जागांवर मनसे विरुद्ध महायुती सा सामना रंगणार आहे. या २५ जागांपैकी भाजप 17 जागांवर तर शिवसेना शिंदे गट 16 जागांवर निवडणूक लढवत आहे.

मुंबईतील कोणत्या जागांवर शिंदे गट विरुद्ध मनसे लढत? 

मतदारसंघ शिंदे गट महाविकासआघाडी मनसे
अणुशक्तीनगर अविनाश राणे सना मलिक शेख नवीन आचार्य
कुर्ला मंगेश कुडाळकर मिलिंद कांबळे प्रदीप वाघमारे
वरळी मिलिंद देवरा आदित्य ठाकरे संदीप देशपांडे
विक्रोळी सुवर्णा कारंजे सुनील राऊत विश्वजित ढोलम
माहीम सदा सरवणकर महेश सावंत अमित ठाकरे
चेंबूर तुकाराम काते प्रकाश फातर्पेकर माऊली थोरवे
मानखुर्द शिवाजीनगर सुरेश पाटील अबु आझमी जगदीश खांडेकर
भांडुप पश्चिम अशोक पाटील रमेश कोरगावकर शिरीष सावंत
चांदिवली दिलीप लांडे आरिफ खान महेंद्र भानुशाली
जोगेश्वरी पूर्व मनीषा वायकर अनंत बाळा नर भालचंद्र अंबुरे
दिंडोशी संजय निरुपम सुनील प्रभू भास्कर परब
मागाठाणे प्रकाश सुर्वे उदेश पाटेकर नयन कदम
VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು