US Election Results 2024 : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा विजय मिळवला आहे. ट्रम्प यांचा विजय अनेक अर्थांनी भारताच्या फायद्याचा आहे. भारताच्या नव्या शत्रुला याची किंमत चुकवावी लागेल.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी बांग्लादेशला अराजकाकडे ढकललं असं डोनाल्ड ट्रम्प आधीच बोलले आहेत. तिथे हिंदुंवर हल्ला करण्यात आले. जाळपोळ, लुटमार करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले तर बांग्लादेशातील स्थिती बदलणार हे निश्चित आहे.
ट्रम्प काय म्हणाले?
बांग्लादेशातील हिंदुंना सुरक्षेच आश्वासन देत डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींच कौतुक केलं होतं. कमला हॅरिस यांच्यावर हिंदुंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. अमेरिकेतील धर्म विरोधी, अति डावे यांच्यापासून मी अमेरिकी हिंदुंच रक्षण करीन असं ट्रम्प म्हणाले होते. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची चांगली मैत्री आहे. आता दोन्ही नेते एकत्र येऊन बांग्लादेशातील हिंदू सुरक्षेबद्दल काहीतरी करतील अशी अपेक्षा आहे.
आता लगाम लागणार
शेख हसीना यांच्यानंतर बांग्लादेशात सत्तेवर आलेल्या अंतरिम सरकारने भारताविरोधात अनेक पावलं उचलली आहेत. बायडेन हे यूनुस सरकारचे समर्थक आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर युनूस सरकारवर नियंत्रण येईल.
Author: VS NEWS DESK
pradeep blr