Search
Close this search box.

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घेणार ग्रे डिव्होर्स? कित्येक वर्ष सोबत राहिल्यानंतर उतार वयात कपल्स घटस्फोट का घेतात?

ऐश्वर्या आणि अभिषेक ग्रे डिव्होर्स घेणार असल्याची चर्चा आहे. आता ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या ग्रे डिव्होर्सच्या चर्चांनंतर ग्रे डिव्होर्स हा प्रकार नेमका काय आहे? असा देखील प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय.

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घेणार ग्रे डिव्होर्स? कित्येक वर्ष सोबत राहिल्यानंतर उतार वयात कपल्स घटस्फोट का घेतात?
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे प्रचंड चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. आतादेखील त्यांच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक ग्रे डिव्होर्स घेणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या दोघांच्या चाहत्यांना त्यांनी वेगळं होऊ नये, अशी इच्छा आहे. पण दोघांच्या नात्यात आता कटुता आल्याने ते वेगळं होणार असल्याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे. आता ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या ग्रे डिव्होर्सच्या चर्चांनंतर ग्रे डिव्होर्स हा प्रकार नेमका काय आहे? असा देखील प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. त्यामुळे आपण ग्रे डिव्होर्स काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

ग्रे डिव्होर्स घेण्यामागची कारणे काय?

1) एकटेपणा

ग्रे डिव्होर्सची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये एकटेपणा वाटणं हे देखील एक कारण मानलं जातं. एका विशिष्ट वयानंतर विवाहित जोडपं फ्री होतात. त्यांचे मुलं मोठे होतात. ते दुसऱ्या शहरात आपल्या परिवारासह कामानिमित्त राहायला जातात. अशा काळात घरी राहणाऱ्या जोडप्याला आपल्या पार्टनरचा वेळ आणि भावनिक पाठिंब्याची गरज लागते. पण अशावेळी पार्टनरचे विचार आणि मन जुळत नाही त्यावेळी एकटेपणा जाणवायला लागतो. अशावेळी दोघांमध्ये मतभेद होतात, वाद होतात आणि अखेर गोष्ट घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचते.

2) आर्थिक कारण

बऱ्याचदा निवृत्तीनंतर विवाहित जोडप्यांमध्ये आर्थिक कारणास्तव भांडण होतात. सारखे वाद होत असल्याने त्यांचे परस्परांच्या मनात एकमेकांविषयीचा आदर आणि प्रेम कमी होत जातं. घरातील शांतता सातत्याने भंग होते. त्यामुळे अखेर दोन्ही जण मिळून एकमेकांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतात.

3) फसवणूक होणं

लग्न हे विश्वासावर चालणारं नातं आहे. याच विश्वासावर सात जन्माची साथ द्यायची शपथ घेतली जाते. पण अनेकदा लग्नानंतर काही वर्षांनी जोडीदाराकडून फसवणूक केली जाते. त्यामुळे ते नातं तुटतं.

4) आरोग्याच्या समस्या

काही वेळेला गंभीर आजारांमुळे देखील नात्यामध्ये कुटुता येते. अनेक कपल्सला वाटतं की, वय वाढेल तसं आपण आजाराचा सामना करु शकणार नाही. यामुळे नात्यात कुणीतरी कमी पडतं आणि ते नातं पुढे टिकणं कठीण होऊन बसतं.

5) अपेक्षा पूर्ण न होणं

अनेकदा लग्न झाल्यानंतरची काही वर्ष खूप गंमतीची, आनंदाची जातात. पण काही वर्षांनी जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून विवाहित जोडप्यात कटूता निर्माण होते. जोडीदाराच्या अपेक्षांचं ओझं पेलू न शकल्यामुळे काही जणांची चिडचिड होते. अनेक जण जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षादेखील करतात. त्यामुळे दोघांमध्ये सारखी भांडणं होता. अखेर घटस्फोटाने या घटनांना विराम लागतो.

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು