BJP Maharashtra : राहुल गांधी हे जे लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधतात, पण त्या लाल पुस्तकात फक्त कोरी पाने आहे. ते संविधान नाही असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 6 नोव्हेंबरला नागपूरच्या रेशीमबागेत संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. नागपुरातील भट सभागृहात संविधान सन्मान संमेलनात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज संविधानाचा दाखला देत सरकारवर कडाडून टीका केली आहे. दरम्यान, कार्यक्रमात राहुल गांधी हे जे लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधतात, पण त्या लाल पुस्तकात फक्त कोरी पाने आहे. ते संविधान नाही असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
राहुल गांधींचं संविधान पुस्तक हे कोरं असल्याचा व्हिडिओ भाजपकडून (BJP Maharashtra) ट्विट करण्यात आला आहे. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा भाजपकडून निषेध देखील करण्यात आला आहे. भाजपनं आपल्या एक्स अकाऊंटवरून ही टीका करत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लक्ष्य केलं आहे.
भाजपच्या एक्स अकाऊंटवरून राहुल गांधीवर टीका
संविधान सिर्फ बहाना है,
लाल पुस्तक को बढ़ाना है..
मोहब्बत के नाम पर
सिर्फ नफरत फैलाना है…
आरक्षण विरोधी (@INCIndia) काँग्रेसची ही संविधान संपवण्याची पहिली पायरी तर नाही ना? काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लक्षात ठेवा, श्रध्देय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी काँग्रेसला जनताच धडा शिकवेल. संविधानाच्या मारतात बाता.. काँग्रेसचा एकूण विषयच खोटा.. संविधान विरोधी काँग्रेस असे या ट्विटमध्ये भाजपने म्हटले आहे.
काँग्रेस हा ढोंगी पक्ष
काँग्रेस हा ढोंगी पक्ष आहे. संविधानाच्या कोऱ्या प्रती वाटून आज परत एकदा काँग्रेसने ढोंगीपण सिद्ध केला. हा फक्त संविधानाच्या अपमान नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे बोलले ते योग्य असल्याचे मत नागपूर मधील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
Author: VS NEWS DESK
pradeep blr