Search
Close this search box.

INDIA ची वज्रमूठ ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात! बैठकीसाठी मुंबईची निवड का? Inside Story

मुंबई, 29 जुलै : विरोधकांनी इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आव्हान दिलंय. विरोधकांची सप्टेंबर महिन्यात मुंबईत बैठक होणार आहे. त्यावरून आतापासूनच राजकारण सुरू झालंय. एनडीएला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूसिव अलायंस म्हणजेच I.N.D.I.A.ची मुंबईत बैठक होणार आहे. 1 ते 3 सप्टेंबर या तीन दिवसीय बैठकीसाठी विरोधी पक्षांचे देशभरातील 150 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या असल्या तरी उद्धव ठाकरेंसोबत शिवसैनिक मोठ्या संख्येनं असल्याचं दावा केला जातो. परिणामी इंडियाच्या बैठकीतून सर्व विरोधक उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा संदेश देण्यासाठी मुंबईची निवड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर भाजपनं याच मुद्यावरून ठाकरे गटाच्या जिव्हारी लागणारी टीका केलीय. ‘राष्ट्रवादी’ पुन्हा? एकत्र येण्याचे धुमारे, सुटले समेटाचे वारे! ‘स्वत:चा पक्ष राहिला नाही, कार्यकर्ते राहिले नाहीत, आमदार राहिले नाहीत. मी आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापूरतं राहिलं आहे, त्यामुळे दुसऱ्याच्या घरात घुसून कुठे जागा मिळते का, हा उद्धव ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न आहे,’ अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष अशी सरळ लढत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप एनडीएच्या माध्यमातून मैदानात उतरणार आहेत. तर सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधकांनी त्यांच्या 26 घटकपक्षांची I.N.D.I.A. आघा़डी मैदानात उतरवली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पाया खालची वाळू सरकल्यानं तर्कहीन वक्तव्य केली जात असल्याचा टोला ठाकरे गटाकडून लगावण्यात आलाय. लोकसभा निवडणुकांच्या आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय लढाईला सुरूवात झालीय. विरोधकांनी त्यांच्या इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आव्हान दिलंय. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही 10 दिवसात एनडीएच्या तब्बल 430 खासदारांची भेट घेणार आहेत. एकंदरीतच निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरूवात झाली असून मुंबईच्या रणांगणावर जोरदार लढाई होणार असल्याचं स्पष्ट झालंय. ‘उद्धव ठाकरेंच्या घरगुती मुलाखतीवर…’, फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು