Ajit Pawar on Raj Thackeray, Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा सुरु केल्या आहेत. दरम्यान, या सभांमधून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “त्याला म्हणावं तुमचं इंजिन आणि मनसे घेऊन बस ना बाबा बाकीचं तुला काय करायचे आहे. आज लोकशाहीत बहुमताचा आदर केला जातो. पक्ष हा कुणाच्या एकट्याच्या मालकीचा नसतो असं पवार साहेब म्हटले होते. पुढे कुणी ना कुणी पक्ष चालवत असतं”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
अशा पद्धतीची वक्तव्य महाराष्ट्र सहन करत नाही, आम्हाला ते मान्य नाही
अजित पवार म्हणाले, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध केला आहे,त्याच ट्विट ही केलं आहे. त्यांना मी फोन केला होता, तुम्ही केलेले हे स्टेटमेंट आम्हाला कुणालाही आवडले नाही. तुम्ही हे बंद करा वैयक्तिक कुणाच्या विषयी बोलणं आपल्याच पद्धत नाही, असं मी त्यांना म्हणालो आहे. मी निषेध केलेला आहे. अनेक नेतेमंडळी येतीलल अनेक राष्ट्रीय नेते येतील कोणीच कुणाच्या बद्दल बोलणं नाही पाहिजे. तुम्हाला जी भूमिका मांडायची आहे, ती मांडा. तुमची विचारधारा इतरांची विचारधारा वेगळ्या असू शकते. मतमतांतर असू शकतात. ताळमेळ ठेवून बोलला पाहिजे हा निंदनीय प्रकार आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी सारखा प्रकार आहे. अशा पद्धतीची वक्तव्य महाराष्ट्र सहन करत नाही, आम्हाला ते मान्य नाही.
भोरमध्ये उमेदवार अधिकृत नाही, पुरंदरमध्ये अधिकृत उमेदवार आहे
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, काही ठिकाणी महायुतीचे दोन फॉर्म राहिले आहेत. दोन-तीन ठिकाणी अशा पद्धतीने घडलं आहे. ते कमी करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करत होतो. भोरमध्ये उमेदवार अधिकृत नाही. पुरंदरमध्ये अधिकृत उमेदवार आहे. श्रीरामपूर सिंदखेड राजा आणि देवळालीमध्ये उमेदवार आहेत, याबद्दल आमचे चर्चा झाली आहे. आज आज किंवा उद्यापासून यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नवाब मलिक आमचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे मी त्यांच्या रॅलीमध्ये जाणार त्यांच्यावर अजून आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यांना दोषी कसे ठरवता मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री काय करावे हा त्यांचा अधिकार, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. सिंचन घोटाळा माहिती अधिकारात पाहिजे. ती माहिती तुम्हाला पाहायला मिळते. एखाद्याने चुकीचे सांगितलं तर तुम्ही दुरुस्त करून घ्यायला पाहिजे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील मतदारांना फसवायला लागले आहेत
काही राजकीय लोक बनवाबनवी करायला लागले आहेत. महाराष्ट्रातील मतदारांना फसवायला लागले आहेत. आमच्या सरकारने ज्यावेळेस दीड हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आमच्यावर टीका झाली. कशाचा कशाला वेळ नाही ही रक्कम फार मोठी वाढते आहे. धादांत खोटं आश्वासन दिल जात आहे. आमच्या योजनेवरच टीका करत होते, सगळ्या प्रकारची टीका केली पण आता तीन हजार रुपये इकडे चार हजार रुपये अजून काही मोफत आता आश्वासन दिली जातयत, बजेट संपवायचं काम आहे. सात लाख बजेट पैकी पाच लाख आता आश्वासनात संपवले आहेत, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी पवारांची,अजित पवारांचं मिश्किल उत्तर
इतर महत्त्वाच्या बातम्या
Author: VS NEWS DESK
pradeep blr