Search
Close this search box.

महायुतीत वाद ! भाजपाचा विरोध डावलून अजित पवारांकडून नवाब मलिक यांच्यासाठी प्रचार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदानासाठी आता फक्त 12 दिवस उरले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीमध्ये सर्व काही ठीक नसल्याचं दिसून येत आहे. महायुतीत काही जागांवरुन मतभेद आणि राजकीय तणाव दिसून येत आहे.

कोट्यवधी रुपयांच्या योजना आणि हजारोंपेक्षा जास्त लाभार्थी, धाराशिवमध्ये ‘महायुती’चे पारडे जड
भाजपाचा विरोध डावलून अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मी माझ्या अनेक उमेदवारांच्या रॅलींना जातो. नवाब मलिक भाई यांच्या प्रचारासाठी मी इथं आलो आहे. तुम्हाला लोकांचा उत्साह पाहायला मिळतोय. या रॅलीत सर्व स्तरातील लोक सहभागी झाले आहेत,आम्हाला जनतेचा पाठिंबा मिळत आहे, याचा मला विश्वास आहे की, सर्वाना सोबत घेऊनच विकास शक्य आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा एक भाग आहे . जागावाटपाच्या सूत्रावर निवडणूक लढवत आहे. मानखुर्द मुंबईतील शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पक्षाचे उमेदवार नवाब मलिक यांच्यासाठी अजित पवार यांनी काल रॅली काढून मते मागितली आहेत. तर येथे महायुती घटक पक्षानेही आपला उमेदवार इथं उभा केला आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नवाब मलिक म्हणाले की, लोकांच्या विनंतीवरून मी मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहे. अजित दादांनी मला राष्ट्रवादीची उमेदवार दिली आहे. तर महायुतीनेही माझ्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. जनता आमच्या सोबत आहे आणि याठिकाणी आम्ही विजय मिळवू. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटप करताना भाजपने नवाब मलिक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे भाजपने स्पष्टपणे सांगितले होते.

त्यानंतर महायुतीने शिवसेनेकडून सुरेश पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. आता मानखुर्द शिवाजी नगर जागेवर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेना आमनेसामने आहेत. तिसरे मोठे उमेदवार समाजवादी पक्षाचे अबू आझमी आहेत, जे महाविकास आघाडी आघाडीत आहेत. मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार अबू आझमी आणि नवाब मलिक यांच्यात थेट लढत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು