Search
Close this search box.

लै भारी ऑफर! मतदान केल्याची बोटाची शाई दाखवा अन् दागिन्यांवर 25 टक्के सूट मिळवा!

Maharashtra Assembly Elections Offer : महाराष्ट्रात एकीकडे विधानसभेची रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्ष आता प्रचारात गुंतले आहेत. त्यातच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगासोबतच सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्यातच मुंबईतील काही व्यापारी संघटनाही पुढे आल्या आहेत. ग्राहकांनी मतदान केल्याची शाई दाखवल्यास त्यांना दागिन्यांवर आणि वस्तूंवर सूट दिली जाणार असल्याची ऑफर आता येत आहेत.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी सर्व 288 जागांसाठी मतदान होणार आहे, तर निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोग, प्रशासनासह मुंबईतील अनेक व्यापारी संघटना पुढे आल्या आहेत. ग्राहकांना आकर्षक सवलतीच्या ऑफर दिल्या जात आहेत.मुंबई मतदान करण्यात मागे
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास असा आहे की, मुंबईसारख्या महानगरातील मतदार ग्रामीण भागाच्या तुलनेत मतदानाच्या बाबतीत फारच मागे असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा स्थितीत या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी व्यापारी संघटना ग्राहकांना निवडणूक शाईने चिन्हांकित बोटे दाखवून सवलत देण्याचे बोलत आहेत.

शाईचे बोट दाखवल्यास 25 टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा निर्णय
उमैदमल त्रिलोकचंद झवेरीचे कुमार जैन म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मतदारांना जागृत करण्याचा उद्योगपती नेहमीच प्रयत्न करत असतात. ज्वेलर्स मतदारांना मेकिंगवर सवलत देत आहेत. मतदानाच्या शाईने माखलेले बोट दाखवल्यास 25 टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष जिमी शॉ म्हणाले की, या मोहिमेअंतर्गत असोसिएशनने आपल्या सदस्यांना मतदारांना जागरुक करण्यासाठी, त्यांना मतदानाच्या दिवसाची आठवण करून देण्यासाठी आणि लोकांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यास सुचवले आहे. मतदारांना मतदान केल्यानंतर शाईचे चिन्ह दाखविल्यास सवलत व इतर आकर्षक ऑफर देण्यास संस्थेने सभासदांना सांगितले आहे.

महाराष्ट्रात किती जागांवर कोण लढणार?
महाविकास आघाडीच्या घटकांमध्ये काँग्रेस 103, उद्धव ठाकरेंच शिवसेना 96 आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष 87 जागांवर निवडणूक लढवत आहेत, तर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये भाजप 148, एकनाथ शिंदेंची शिवसेना 80 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 8o जागांवर निवडणूक लढवत आहेत.

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು