BJP leader Sudhakar Khade Murder : एकीकडे निवडणुकांच्या प्रचारांचा धामधुम सुरू असताना भाजप नेत्याची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजपचे उद्योगआघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आलेली आहे. सांगलीत ही घटना घडली. तर पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
‘भिकार संपादक’-राज ठाकरेंचा निशाणा; संजय राऊत म्हणाले- आम्ही चाटूगिरी, चमकोगिरी करणारे लोक नाहीत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर खाडे यांचा शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास पंढरपूर रोडवरील राम मंदिरालगत असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून एका व्यक्तीशी वाद झाला होता. या वादातून त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आला. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना मिरज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या हत्याकांडामुळे राज्यभरात चर्चा रंगली आहे.
नेमका कशावरुन होता वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर खाडे यांनी मिरज-पंढरपूर रस्त्यावरील राम मंदिरालगत चंदनवाले मळा येथील पावणे 4 एकर जमीन सचिन जगदाळे नामक व्यक्तीकडून विकसनासाठी घेतली होती.पण त्यावर लक्ष्मण चंदनवाले यांनी हरकत घेतली होती. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. गत काही महिन्यांपासून या प्रकरणी त्यांचा खाडे यांच्यासोबत वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही खाडे शनिवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसोबत वादग्रस्त भूखंडाला कुंपण घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा शेत जमिनीचे कब्जेधारक असणाऱ्या चंदनवाले कुटुंबीयांशी वाद झाला.
‘भिकार संपादक’-राज ठाकरेंचा निशाणा; संजय राऊत म्हणाले- आम्ही चाटूगिरी, चमकोगिरी करणारे लोक नाहीत
यावेळी सुधाकर खाडे व चंदनवाले कुटुंब यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यात कार्तिक चंदनवाले याने अचानक खाडे यांच्या मानेवर मागच्या बाजूने कुऱ्हाडीने हल्ला केला. हा घाव वर्मी बसल्यामुळे खाडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चंदनवाले कुटुंबाने सुधाकर खाडे यांच्या सहकाऱ्यांवरही हल्ला चढवला. यामुळे घटनास्थळी एकच धावपळ उडाली. या धावपळीतच सुधाकर खाडे यांना मिरज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
चंदनवाले नामक संशयितास केली अटक
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कार्तिक चंदनवाले नामक आरोपीस अटक केली आहे. हा आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात कार्तिक चंदनवाले लक्ष्मण चंदनवाले, शंकर चंदनवाले, काशिनाथ चंदनवाले यांच्यासह 3 महिलांविरोधात गांधी चौक पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.कोण होते सुधाकर खाडे?
सुधाकर खाडे यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले. तिथे ते मनसेचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. त्यांनी 2014 मध्ये तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकही लढवली होती
Author: VS NEWS DESK
pradeep blr