Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे अत्यंत कष्टकरी कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे. आजही ते फावल्या वेळात आपल्या शेतावर राहतात. गुराढोरांसोबत वेळ घालवतात. आपल्या उमेदीच्या दिवसात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी एकनाथ शिंदे यांनी रिक्षा चालवल्याचेही सर्वांनाच ठाऊक आहे. नंतर शिवसैनिक, नगरसेवक, गटनेता, आमदार, जिल्हाप्रमुख, विरोधी पक्ष नेता, मंत्री आणि मुख्यमंत्री अशी पदे एकनाथ शिंदे यांनी भूषविली. पण त्यांची नाळ अजूनही तळागाळाशी जोडली गेली आहे.
गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कष्टकरी आणि सामान्यातील सामान्य वर्गातल्या नागरिकांसाठी लोककल्याणाच्या अनेक योजना राबवल्या. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी महामंडळ स्थापनेचा निर्णय आणि त्यांना विमा संरक्षण हा एकनाथ शिंदे आणि घेतलेला क्रांतिकारी निर्णय म्हणावा लागेल.
मुंबई शहरात टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. मुंबई शहरात ऑटो रिक्षा चालवण्यास परवानगी नाही त्यामुळे शहरात टॅक्सी हेच बेस्ट नंतरचे अंतर्गत वाहतुकीचे साधन आहे. हातावरती पोट असलेला हा कष्टकरी वर्ग. वयोमानानुसार दृष्टी कमी झाली, एखादा अपघात झाला आणि त्यात अपंगत्व आले की टॅक्सी चालकांच्या कुटुंबाची वाताहात होते. बहुसंख्य टॅक्सी चालक चांगला आयुर्विमा काढत नाहीत. जनरल विमा काढण्याकडेही त्यांची टाळाटाळ असते. त्यामुळे त्यांचे आयुष्य जोखमीने भरलेले असते
ग्रामीण भागात रिक्षाचा आधार
वांद्रे पासून पुढच्या मुंबईत आणि महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात तसेच शहरात रिक्षा हे अंतर्गत वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. बस स्थानक किंवा रेल्वे स्थानकापासून आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिक रिक्षाचा वापर करतात. खेड्यापाड्यात ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची वाहने नाहीत त्यांच्यासाठी कुटुंबासह दूरच्या गावी जाऊन येण्यासाठी रिक्षा हेच महत्त्वाचे साधन असते. एखाद्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी ग्रामीण भागात रिक्षाच वापरली जाते.
मुंबईतल्या टॅक्सी चालकांप्रमाणेच खेड्यापाड्यातील रिक्षा चालकांच्या कुटुंबाचे जीवनमान हलाखीचे असते. प्रचंड वाढलेली स्पर्धा, खाजगी वाहनांची वाढलेली संख्या यामुळे रिक्षा चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यांचे परिवार देखील रोजगाराच्या अन्य संधी शोधण्यासाठी धडपडत आहेत. परंतु मुळातच भांडवलाची कमी असल्यामुळे रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक अशा दोघांच्याही पुढच्या पिढ्यांसाठी भविष्याची तरतूद कष्टप्रदतच आहे.
आता होणार स्वतंत्र महामंडळ
आणि टॅक्सी चालकांच्या भविष्याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासन आदेश देखील काढण्यात आला असून या महामंडळाची कर्मचारी रचना शासन आदेशात स्पष्ट करण्यात आली आहे. या महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल. टॅक्सी चालकांना ग्रॅच्युएटी देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे वर्षाला तीनशे रुपये त्यासाठी रिक्षा चालकांना भरावे लागतील. याचे काही पैसे हे सरकार देणार आहे. त्यासाठी उद्योग,खनिकर्म आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल.
अन्य कल्याणकारी योजना
रिक्षा तसेच टॅक्सी चालकांच्या परिवाराला विमा संरक्षण देण्यात येणार आहे. ज्यांची मुलं आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनी सोबत एक करार केला आहे. या महामंडळामध्ये तात्काळ दुखापत होईल त्याला पन्नास हजार रुपये देण्याची तरतूद केली आहे. आरोग्य विभाग पॉलिसी विस्तृत केली जाणार आहे. तसेच या चालकांचं मिनिमम कॅल्क्युलेशन आणि राज्य सरकारने दिलेले पैसे धोरण तयार होईल. ही गरीब लोक आहेत. हे सर्व सामान्यांचे सरकार आहे याचमुळे आम्ही ही योजना आणली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
ठोस निर्णय घेणारे पहिले मुख्यमंत्री
महाराष्ट्रात जवळपास साडेआठ लाख रिक्षा असून दीड लाखाच्या आसपास टॅक्सी आहेत. हा मोठा कष्टकरी वर्ग आहे. आज पर्यंत या वर्गाच्या कल्याणासाठी फक्त चर्चा झाल्या आणि बैठका झाल्या परंतु कुणीही ठोस निर्णय घेतला नाही. एकनाथ शिंदे यांनी मात्र या वर्गाचा साकल्याने विचार करून ठोस निर्णय घेतला आहे त्यामुळे रिक्षा तसेच टॅक्सी चालकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Author: VS NEWS DESK
pradeep blr