Search
Close this search box.

आम्ही महाराष्ट्राला मविआचं ‘एटीएम’ होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रधान मोदी

विदर्भात कॉंग्रेसची कित्येक सरकारानी पाण्याची समस्या सोडविली नाही. आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या सिंचन योजना महाविकास आघाडीने बंद पाडल्या असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोला येथील सभेत केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोला येथील सभेत कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्याच्या संकटाची जननी कोण असेल ती कॉंग्रेस आहे. कॉंग्रेसची कित्येक सरकार येथे आली तर ते अकोला येथील शेतकऱ्यांच्या समस्या दूर करु शकलेली नाही. कर्नाटकात तर कॉंग्रेस सरकारने दारुच्या दुकानदारांकडून सातशे कोटी वसुल केलेले आहेत. ही कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर काय करु शकते याचा विचार करा, किती घोटाळे करु शकते याचा विचार करुनच कॉंग्रेसला थारा देऊ. आम्ही महाराष्ट्राला मविआचं एटीएम होऊ देणार नाही असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी जे सिंचनाचे प्रकल्प सुरु केले होते. ते महाविकास आघाडीच्या सरकारने बंद करुन टाकले. अकोला कापसाच्या शेतीसाठी ओळखला जातो. आम्ही कापसाच्या शेतकऱ्यांना अनेक दशके कॉंग्रेसने न्याय दिलेला नाही. कापूस शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी उद्योग आणि इन्फ्रोस्ट्रक्टर दोन्ही वाढविले जात आहे. मी महाराष्ट्रात टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन केले आहे. टेक्सटाईल पार्कने समृद्धीच्या नव्या संधी निर्माण होतील असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी विधान सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा झाल्या. आज अकोला येथील सभेत नरेंद्र मोदी यांनी जय श्रीरामचा नारा दिला. 9 नोव्हेंबर रोजी राम मंदिराबाबत कोर्टाने निकाल महत्वाचा निकाल दिला, त्याला देशातील सर्व धर्मांनी स्वागत करीत पाठींबा दिला. साल 2014 ते 2024 या दहा वर्षांत महाराष्ट्राने भाजपाला साथ दिली आहे. कारण महाराष्ट्रातील जनतेला राजकीय समज आहे. आणि ती देशप्रेमी आहे. म्हणून मला महाराष्ट्रासाठी सेवा करण्यास अधिक सुख मिळते, त्यामुळे महाराष्ट्रासाठी सर्वाधिक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प आपण मंजूर केले आहेत. एकट्या वाढवण बंदरात केंद्राने 80 हजार कोटी गुंतवणूक केलेली आहे. वाढवण बंदर देशातील सर्वात मोठे बंदर होणार असून देशातील सर्व बंदराची होणारी कामे आणि एकट्या वाढवण बंदरातून होणारे काम तुलनेने एकच असणार आहे इतके हे बंदर भव्य होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोला येथील सभेत सांगितले.
VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು