मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

दाऊद इब्राहिम व गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट प्रिंट करुन त्याची विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दाऊद इब्राहिम व गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट प्रिंट करुन त्याची विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने तत्काळ या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित ई-कॉमर्स वेबसाईट आणि विक्रेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Flipkart, AliExpress, TeeShopper आणि Etsy सारख्या अनेक ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरुन गँगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट विक्री करण्यात आले आहेत. यांसारखे उत्पादन हे गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देण्याचं काम करत आहेत. तरुणाईवर नकारात्मक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रभाव टाकत आहेत. त्यामुळे, यांसारख्या वस्तू समाजिक मुल्यांचं अध:पतन करणाऱ्या असून समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देणाऱ्या आहेत. तसेच, तरुणाई वाईट मार्गाला जाऊन एका पिढीचं आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, महाराष्ट्र सायबर क्राईमने गंभीर दखल घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्रा सायबर विभागाने फ्लिपकार्ट, अलीएक्सप्रेस, टीशॉपर आणि एट्सी यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाईट व विक्रेता प्लॅटफॉर्मवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस), 2023 च्या कलम 192, 196, 353, 3 आणि आयटी अधिनियम, 2000 च्या धारा 67 अन्वये एफआयआर दाखल केली आहे. त्यामुळे, यापुढे अशा प्रकारच्या वस्तूंची विक्री करणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई केली जाऊ शकते.

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು