Search
Close this search box.

मुंबईत D कंपनी आणि बिश्नोई गँग भिडण्याची शक्यता, अधिकाऱ्यांनी लगेच उचचलं पाऊल

मुंबईत आतापर्यंत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच वर्चस्व मानलं जात होतं. पण काही दिवसांपूर्वी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या करुन लॉरेन्स बिश्नोई गँगने मुंबईमध्ये हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. बॉलिवूडमध्ये आधी दाऊदची दहशत होती. पण आता लॉरेन्स बिश्नोई आपाला धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.

मुंबईत D कंपनी आणि बिश्नोई गँग भिडण्याची शक्यता, अधिकाऱ्यांनी लगेच उचचलं पाऊल
Lawrence Bishnoi vs Dawood

मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये गँगवॉर होण्याची चिन्ह दिसतायत. जेलमधील अधिकाऱ्यांनी बिश्नोई गँग आणि डी-कंपनीचे गुंड आपसात भिडू शकतात अशी भिती व्यक्त केलीय. संभाव्य गँगवॉरची शक्यता लक्षात घेऊन लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना दुसऱ्या जेलमध्ये ट्रान्सफर करण्याचा अर्ज जेल ऑथोरिटीने कोर्टात दाखल केलाय. या अर्जात बाबा सिद्दीकी आणि सलमान खानच्या घरावरील फायरिंग प्रकरणात अटक झालेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही सदस्यांना अन्य जेलमध्ये ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे.

जेल अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, बिश्नोई गँगच्या सदस्यांची संख्या आता 20 पेक्षा जास्त झाली आहे. बिश्नोई गँगचे सदस्य जेलमध्ये आपला एक वेगळा गट बनवू शकतात, असा जेल ऑथोरिटीला संशय आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे या बिश्नोई गँगसच्या गुंडांना अन्य जेलमध्ये शिफ्ट करण्यासाठी अर्ज केलाय. जेलमध्ये डी कंपनी आणि राजन गँगचे सुद्धा सदस्य आहेत.

बाबा सिद्दीकी प्रकरणात आतापर्यंत किती जणांना अटक?

जेलमध्ये सध्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी

“जेलमध्ये सध्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. जेलमध्ये अराजक स्थिती निर्माण होऊ शकते” असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान फायरिंग प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना हाय सिक्योरिटी जेलमध्ये ठेवण्यात आलय. अन्य कैद्यांच्या ते संपर्कात येऊ नये, यासाठी असं करण्यात आलय. आर्थर रोड जेलमध्ये डी-गँग आणि छोटा राजन गँगसह अन्य गँगचे सदस्य आहेत. मुंबई क्राइम ब्रांचने बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत 18 आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी शुभम लोंकर, सिद्दीकीचा शूटर शिवकुमार गौतम अजून फरार आहे.

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು