तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी आले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली आहे.
Uddhav Thckeray bag checking in ausa questioned
उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी आले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली आहे. यावेळी, उद्धव ठाकरेंनी कर्माचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
बॅग तपासणाऱ्या अधिकारी व कर्माचाऱ्यांना त्यांचे आयडेंटी कार्ड उद्धव ठाकरेंनी विचारलं, तसेच, तुमचं अपॉईंटमेंट लेटर दाखवा, असेही ते म्हणाले. त्यानंतर, कर्मचाऱ्यांनी त्यांचे आयडेंटीटी दाखवत
3/8
माझी बॅग तपासणाऱ्यांबद्दल मला आक्षेप नाहीच, मला माझ्यातला फोटोग्राफर जपता आला असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातूनही बॅग तपासणीवर भाष्य केलं. तसेच, मला जो कायदा लावता तो मोदी आणि शाह यांनाही लावा, असेही ठाकरेंनी म्हटले.
4/8
उद्धव ठाकरेंनी बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच फिरकी घेतली, दरवेळेला मीच तुमचं पहिला गिऱ्हाईक असतो का, असा मिश्कील टोलाही लगावला.
5/8
आपल्या बॅगेची व हेलिकॉप्टरची तपासणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी संबंधित कर्मचाऱ्यांना जिल्ह्याच्या कलेक्टरचं नाव विचारलं. त्यावेळी, श्रद्धा ठाकूर ह्या जिल्हाधिकारी असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
6/8
मोदीजी आणि अमित शाह तुम्ही पदावर बसायला लायक नाहीत, राज्यातली जनता तुमच्या थापांना कंटाळली आहे. अभिमन्यू पवार सोडून तुमच्या खात्यात 15 लाख रुपये आले का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला
7/8
दरम्यान, औसा येथील मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अभिमन्यू पवार आहेत. त्यांच्याविरुद्ध ठाकरेंचे दिनकर माने मैदानात आहेत.
8/8
दरम्यान, माझा तुमच्यावर कसलाही राग नाही, महाराष्ट्रासाठी काम करा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांशी आपुलकीचा संवाद साधला