Search
Close this search box.

Rahul Gandhi : आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; राहुल गांधींचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल

संविधान रिकामं असा उल्लेख करून तुम्ही भारताचा अपमान करत आहात, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर कडाडून हल्लाबोल केला. Rahul Gandhi : नरेंद्र मोदीजी म्हणतात की हे संविधान पोकळ आहे, पण आयुष्यात ते वाचलं नसल्याने त्यांना ते रिकामं वाटतं. हे संविधान रिकामं नसून हजारो वर्षांची विचारसरणी, बुद्ध देवाची विचारसरणी, फुले, आंबेडकरांची विचारसरणी आहे. गांधींच्या विचाराचा, हा भारत आहे. होय, ते पोकळ नाही, भारताचे ज्ञान, भारताचा आत्मा आहे आणि रिकामं असा उल्लेख करून तुम्ही भारताचा अपमान करत आहात, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी आणि रंगावरून बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर कडाडून हल्लाबोल केला. संविधानाचा रंग कोणता आहे, ते निळे आहे, ते लाल आहे याने आम्हाला फरक पडत नाही, आम्ही त्यामध्ये काय लिहिले आहे ते संरक्षित करतो. काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी त्यासाठी बलिदान द्यायला तयार आहोत, असे राहुल म्हणाले.

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು