Search
Close this search box.

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, ‘तेव्हा मी सांगितले होते की..

Ajit Pawar on Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबामध्ये सुद्धा फूट पडली आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनीता पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये रिंगणात उतरवल्यानंतर हे संबंध अधिक ताणले गेले आहेत. त्यामुळे अजित पवार विरुद्ध काका विरुद्ध आता सख्खा भाऊ असा संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अजित पवार नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीला सुद्धा भाऊबीजसाठी गेले नाहीत. त्यामुळे पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे. पक्षीय पातळीवर राजकीय फुटींची चर्चा रंगली असतानाच कुटुंबामध्ये झालेली फूट सुद्धा चर्चेचा विषय झाला आहे.

भाऊबीजेला मी सकाळी पावणे सातला बाहेर पडलो

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये कौटुंबिक संबंधांवर भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी माझा भाऊ माझ्यावर फारच नाराज असल्याचे म्हटलं आहे. तो फार टोकाचे बोलत असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात तुमचं काही बोलणं झालं आहे का? असं विचारलं असतान त्यांनी नाही अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, भाऊबीजसाठी अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्याकडे भाऊबीजसाठी गेले नव्हते. त्या संदर्भात त्यांना विचारण्यात असता ते म्हणाले की, भाऊबीजेला मी सकाळी पावणे सातला बाहेर पडलो, मी तेव्हा सांगितलं होतं की साडेसहाला जेवढ्या बहिणी येतील त्यांची भाऊबीज करून मी बाहेर पडणार आहे. तीन बहिणी आल्या, त्यांची भाऊबीज करून मी बाहेर पडलो असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पक्ष फुटीनंतर सुप्रिया सुळे यांच्याबरोबर संपर्क झाला होता का?

दरम्यान पक्ष फुटीनंतर सुप्रिया सुळे यांच्याबरोबर संपर्क झाला होता का? अशी विचारणा केली असता अजित पवार यांनी अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. एक दोन वेळा फोनवर संपर्क झाला तेवढाच एवढीच प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. दरम्यान. याच अनुषंगाने त्यांना शरद पवार यांच्याशी संपर्क झाला का? असं विचारण्यात आलं असता अजित पवार यांनी मोजक्याच शब्दात उत्तर दिले. त्यानंतर संबंध आलेला नाही. मी माझ्या कामांमध्ये व्यस्त असतो, ते त्यांच्या कामात व्यस्त असतात अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

बारामती विधानसभेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार

दुसरीकडे, कौटुंबिक संबंध ताणले गेले असतानाच बारामती विधानसभेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. या ठिकाणी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे अजित पवारांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे बारामती कौल कुणाच्या बाजूने देणारे याचे उत्तर 23 नोव्हेंबर रोजीच मिळणार आहे. त्यामुळे प्रचाराला सुद्धा धार आली आहे. अजित पवार यांच्याकडून सुद्धा भावनिकतेला हात हात घालून प्रचार केला जात आहे, तर दुसऱ्या बाजूने शरद पवार गटाकडून सुद्धा ताकदीने प्रचार केला जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीने सुप्रिया सुळे यांना साथ दिली असली, तरी विधानसभेला नंबर दादांना साथ देणार की नाही युगेंद्र पवार काकांना आसमान दाखवणार? याचीच चर्चा सर्वाधिक रंगली आहे.

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು