बच्चू कडू यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव, राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह, त्यांचं पुढे काय होणार?

Achalpur Assembly Election Result 2024 : प्रहार संघटनेचे नेते आणि दिव्यांगांचे तारणहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा अचलपूर मध्ये झालेला पराभव धक्कादायक असून बच्चू कडू यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 2004 पासून ते या मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते.

बच्चू कडू हे अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामाजिक कार्याच्या आवडीच्या जोरावर त्यांनी राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले.. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी सामाजिक कार्य सुरुवात केली. आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतील स्थानिक नेतृत्वाशी बिनसल्यामुळे त्यांनी स्वतंत्र वाटचाल सुरू केली. पंचायत समिती ते आमदार आणि मग मंत्री असा त्यांचा प्रवास झाला.

अपंगांचा व रुग्णांचा आधार अशी ओळख

अपंगांचा आणि रुग्णांचा आधार म्हणून बच्चू कडू यांच्याकडे पाहिले जाते. अमरावती जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यासाठी बच्चू कडू यांचे प्रहार संघटना विशेष प्रयत्न करते. दिव्यांगांसाठी देखील बच्चू कडू यांनी अनेक आंदोलने केली. शेतकरी वंचित शोषित यांचा आवाज उठवणारा नेता म्हणून बच्चू कडू यांची महाराष्ट्राला ओळख आहे. सामान्य जनतेसाठी बच्चू कडू यांनी प्रशासनाशी देखील पंगा घेतला. अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक देखील झाली मात्र बच्चू कडू यांनी आपल्या कृत्याबद्दल कधीही माफी मागितलेली नाही.

2022 मध्ये शिंदेंना पाठिंबा दिला

2019 आली निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची घरोबा केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या आमदारांमध्ये बच्चू कडू यांचा समावेश होता. राजकीय पक्षांचे अधिकृत आमदार पोलीस संरक्षणात फिरत असताना बच्चू कडू मात्र खुल्लम खुल्ला एकटेच वावरत होते. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले. दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मात्र ती मान्य झाली नाही. 2022 साली एकनाथ शिंदे आणि शिवसेनेत बंद केले आणि ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या सरकारला देखील बच्चू कडू यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. बच्चू कडू यांच्या मागणीनुसार स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची स्थापना एकनाथ शिंदे यांनी केली.

बच्चू कडू दुसऱ्या क्रमांकावर गेले

या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढणे पसंत केले. त्यांना भाजपचे प्रवीण तायडे आणि काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख यांनी आव्हान दिले होते. बच्चू कडू दुसऱ्या क्रमांकावर राहिले. प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी बच्चू कडूंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अचलपूर, रावेर, चांदवड, देगलूर – सुभाष सामने या जागा बच्चू कडू यांच्या पक्षाचा समावेश असलेल्या परिवर्तन महाशक्तीने लढवल्या होत्या. तिथे त्यांचा पराभव झाला.

अचलपूर मतदारसंघातून झालेल्‍या पराभवाविषयी बोलताना बच्‍चू कडू म्‍हणाले, “माझी ओळख ही पदामुळे नाही, तर कार्यामुळे आहे. लोकसेवेचे कार्य आपण सर्व जण करतच राहू. कार्यकर्त्‍यांनी स्‍वत:ला एकटे वाटू देऊ नका. मी तुमच्‍यासोबत ताकदीने आणि मजबुतीने उभा राहील. आज जरी हरलो असलो, तरी उद्याचा विजय आपलाच आहे.

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು