Search
Close this search box.

मुंबईत मृतावस्थेत आढळली एअर इंडियाची पायलट, धक्कादायक बाब समोर; २५ वर्षीय तरुणीसोबत काय घडलं?

Air India Pilot Found Dead In Mumbai : एअर इंडियाच्या महिला पायलटचा मृतदेह मुंबईत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सृष्टी एअर इंडियात पायलट म्हणून कार्यरत होती. तिच्या अशा जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.मुंबई : मुंबईत एअर इंडियाच्या तरुण महिला पायलटचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. २५ वर्षीय सृष्टि तुली या महिला पायलटच्या निधनानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सृष्टीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबियांनी सृष्टीच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत असलेल्या सृष्टीचा मृतदेह अंधेरीतील मरोळ येथे आढळला. सोमवारी ती मृतावस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रविवारी ड्यूटीवरुन घरी परत आल्यानंतर तिने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सृष्टी तुलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकरावर आरोप करत त्यानेच आत्महत्येसाठी सृष्टीला प्रवृत्त केल्याचं म्हटलं आहे.

तिच्या प्रियकराने तिच्याशी गैरवर्तन केलं होतं. प्रियकराच्या छळामुळे ती त्रस्त होती, अनेकदा सार्वजनिक ठिकाणी त्याने सृष्टीशी गैरवर्तन केलं होतं. तसंच प्रियकराने तिला नॉनव्हेज खाण्यापासूनही रोखलं असल्याचा आरोप सृष्टीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराला वैताकूनच तिने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

महिला पायलटचा प्रियकर ताब्यात

पवई पोलिसांनी मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी सृष्टीच्या प्रियकराला २७ वर्षीय आदित्य पंडित याला ताब्यात घेतलं आहे. मूळचा दिल्लीचा असलेल्या आदित्यवर सृष्टीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करुन चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. सृष्टीच्या कुटुंबियांनीही मुंबई पोलिसांकडे याप्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोंदवण्यात आलेल्या एफआयआरनुसार, सृष्टी आणि आदित्य दोघेही दोन वर्षांपूर्वी कमर्शियल पायलट लायसन्स (सीपीएल) प्रशिक्षणादरम्यान दिल्लीत भेटले होते. ट्रेनिंगवेळी सृष्टी दिल्लीतील द्वारका येथे राहत होती. ट्रेनिंगनंतर तिला एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली आणि जून २०२३ मध्ये ती मुंबईत आली होती.

सृष्टी ही मूळची उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात राहणारी आहे. ती गोरखपूरची पहिली महिला पायलट होती. तिला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून सन्मानितही करण्यात आलं होतं. मात्र आता तिच्या अशा अचानक जाण्याने सोशल मीडियावर अनेकांकडून दु:ख व्यक्त होत असून तिला ब्राईट स्टार म्हणून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು