राष्ट्रवादीकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदाची मागणी; कोणाला मिळणार संधी, समोर आली 7 नावं

राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आधीपासूनच मवाळ भूमिका घेणार्‍या अजित दादांच्या राष्ट्रवादीने महायुतीत 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. असे असताना निकाल जाहीर होऊन आज चौथा दिवस उजाडला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसून येत नाही. त्यामुळे, महायुतीला एवढं बहुमत असतानाही मुख्यमंत्री का ठरत नाही, सरकार का स्थापन होत नाही, असे अनेक सवाल राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांना पडला आहे.   त्यातच, मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आज या शर्यतीतून माघार घेतल्याची माहिती पुढे आली आहे. जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आणि अमित शाह (Amit Shah) घेतील तो आम्हाला मान्य आहे, असं शिंदेंनी म्हटलंय. त्यानंतर आता भाजपाचा मुख्यमंत्री असणार असे संकेत दिसू लागले आहेत. तर दुसरीकडे अजित दादांच्या राष्ट्रवादीतून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आधीपासूनच मवाळ भूमिका घेणार्‍या अजित दादांच्या राष्ट्रवादीने महायुतीत 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी मिळण्याची ही शक्यता आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युवा चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असून अशी माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. त्यामुळे या पदावर आता कुणाची वर्णी लागते ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

धनंजय मुंडे
अदिती तटकरे
अनिल पाटील
हसन मुश्रीफ
धर्मराव बाबा अत्राम
अजित पवार
छगन भुजबळ

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांची पसंती
गिरीश महाजन – सरकारचे संकटमोचक म्हणून चेहरा, सोबतच उत्तर महाराष्ट्रात भाजपला चांगलं यश लोकसभा आणि विधानसभेत मिळवून दिलंय 
रविंद्र चव्हाण – पडद्यामागून काम करणारे व्यक्तीमत्व, भाजपला कोकणातील जागा मिळवून देण्यात चव्हाण यांचा मोठा वाटा 
मंगलप्रभात लोढा – मुंबई शहरातून भाजपचा मोठा चेहरा आणि पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं गुजराती, जैन समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाची व्यक्ती 
चंद्रशेखर बावनकुळे – विधानसभेत मोठं यश मिळवून दिल्याने पुन्हा एकदा वर्णीची शक्यता 
आशिष शेलार – मुंबई अध्यक्षाच्या दृष्टीनं निवडणुकीत चांगली कामगिरी, सोबतच, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है संदर्भातलं धोरण राबवलं, आणि नोमानीचा व्हीडिओ समोर आणला, अशात पुन्हा मंत्रीपदाची शक्यता
नितेश राणे – हिंदूत्व पोस्टर बाॅय म्हणून राणेंची ओळख, भाजपसाठी हिंदुत्वाचा चेहरा, कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ है चा नारा पुढे नेण्यात मोठं काम 
शिवेंद्रसिंहराजे भोसले – पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा, मोठ्या लीडनं शिवेंद्रराजेंचा विजय, भोसले घराण्याचा चेहरा 
राहुल कुल – दौंडमधून तिसऱ्या विजयी, राष्ट्रवादी कांग्रेसला सुरुंग लावत पुन्हा आमदार 
माधुरी मिसाळ – 2009 पासून पर्वती मतदारसंघातून आमदार, पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मंत्रीपदाची शक्यता 
संजय कुटे – पश्चिम विदर्भातील भाजपचा चेहरा, फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख, सोबतच पडद्यामागून पक्ष करणारे आणि संघाच्या फळीतील चेहरा 
राधाकृष्ण विखे पाटील – नगर जिल्ह्यातील चेहरा आणि भाजपातील ज्येष्ठ चेहरा 
गणेश नाईक – नवी मुंबई तील भाजपचा मोठा चेहरा, यंदा विजय झाल्याने संधी मिळण्याची शक्यता 
पंकजा मुंडे – ओबीसी आणि मराठवाड्यातील चेहरा 
गोपीचंद पडळकर – जतमधून आमदार, राम शिंदे हरल्याने रोहित पवारांविरोधात ताकद उभी करत शह देण्याचे प्रयत्न होऊ शकतात, धनगर चेहरा 

कोणाला डच्चू मिळण्याची शक्यता-

विजयकुमार गावित 
सुधीर मुनगंटीवार 

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-

उदय सामंत 
शंभूराज देसाई 
गुलाबराव पाटील 
संजय शिरसाट 
भरत गोगावले 
प्रकाश सुर्वे 
प्रताप सरनाईक 
तानाजी सावंत 
राजेश क्षीरसागर 
आशिष जैस्वाल 
निलेश राणे 

कोणाला डच्चू मिळणार?

दीपक केसरकर 
अब्दुल सत्तार 
संजय राठोड

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು