Maharashtra CM: एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा तर झाला आहे. पण हा मार्ग तितका सोपा नसेल, असे काही ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे.
Maharashtra CM: यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी आपण सर्वांनीच पाहिली. महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षश्रेष्ठींनी सत्ता मिळवण्यासाठी आपले प्रयत्न पणाला लावले होते. यानंतर 23 नोव्हेंबरला निकालही आला, ज्यात महायुतीच्या पदरात मतांचं पारडं जड दिसलं. त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या पदासाठी अनेकांची नावंही ऐकायला मिळली. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचंही नाव होतं. मात्र बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच (BJP) असू शकतो, असे स्पष्ट केले. त्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा तर झाला आहे. पण हा मार्ग त्यांच्यासाठी तितका सोपा नाही, असे काही ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रात आता काय घडणार? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार का? ग्रह, नक्षत्र आणि ग्रहांच्या हालचालीवरून समजून घेऊया..
2 डिसेंबरची तारीख महत्त्वाची! महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार?
पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदासाठी आपली कोणतीही नाराजी किंवा इच्छा नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करतात. ज्यामुळे आता पक्ष पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवणार का? अशी चर्चा सुरू आहे. सध्या राजकीय वर्तुळातून समोर येत असलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 2 डिसेंबरला शपथविधी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे, हिंदू पंचागानुसार हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. 2 डिसेंबर ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी असेल. जो शुभ कार्यासाठी उत्तम दिवस आहे. सोमवार असल्याने त्याची शुभता वाढत आहे. या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र असेल, त्याचा स्वामी बुध आहे, जो दुपारी 3.46 पर्यंत राहील, त्यानंतर मूल नक्षत्र दिसेल. या नक्षत्रात शपथ घेणे सामान्यतः चांगले मानले जात नाही. कारण हा एक क्रूर नक्षत्र आहे. 2 डिसेंबर रोजी धृती योग तयार झाला आहे. हा योग शुभ आणि नवीन कामांसाठी शुभ मानला जातो. पंचांगानुसार अभिजीत मुहूर्त 2 डिसेंबर रोजी सकाळी 11:49 ते दुपारी 12:31 पर्यंत असेल.
शनीची साडेसाती अडचण निर्माण करणार? देवेंद्र फडणवीसांची कुंडली काय सांगते?
आजकाल इंटरनेट आणि सोशल मी़डियाच्या जमान्यात अनेक गोष्टी सहज उपलब्ध होतात. इंटरनेटवर उपलब्ध असलेली देवेंद्र फडणवीस यांची जन्मकुंडली जर पाहिली, तर त्यात 22 जुलै 1970 रोजीच सकाळी 6 वाजता जन्म, स्थान नागपूर असं यात म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांची कुंडली कर्क राशीची असून राशी कुंभ आहे. ज्यावर शनीच्या साडेसातीचे दुसरे चरण चालू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीत शनी दहाव्या भावात स्थित आहे, जो सार्वजनिक सहकार्य दर्शवतो, तर देव गुरु चौथ्या भावात स्थित आहे. ग्रहाचे हे घर जनतेच्या राजाशी संबंधित आहे. त्यात शनिची दृष्टीही पडत आहे. ज्यामुळे देव गुरु म्हणजेच बृहस्पतीचा मोठा पाठिंबा दिसत आहे, ज्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि पाठिंबा दोन्हीही मिळणार असल्याची शक्यता आहे.
हायकमांडचा पाठिंबा मिळण्याचे संकेत?
ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या देवेंद्र फडणवीस केतूच्या प्रभावाखाली आहेत. मात्र 27 नोव्हेंबरचा दिवस त्यांच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. कारण बृहस्पति ने केतू-चंद्र-शुक्रासोबत विश्वांतरी महादशात प्रवेश केला आहे. ज्यामुळे हायकमांडचा पाठिंबा मिळण्याचे संकेत दिसत आहेत. कुंडलीतील गुरूची साथ त्यांच्यासाठी 1 डिसेंबरपर्यंत फायदेशीर ठरणार असल्याचं दिसत आहे.
फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या सर्वात जवळ!
ज्योतिषशास्त्रानुसार आणि ग्रहगणनेनुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या सर्वात जवळ असल्याचे दिसते. फडणवीसांच्या कुंडलीत बृहस्पतिची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचे दिसून येते, ज्यामुळे त्यांना राजकारणात अशा लोकांचा पाठिंबा आहे, जे पडद्यामागे राहून त्यांना संकटाच्या वेळी मदत करण्याचे काम करतात. केतूसोबत असलेली गुरूची साथ त्या व्यक्तीला शुभ फळ देण्यास उशीर करत नाही. 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 पर्यंत हीच परिस्थिती येथे दिसून येते. 2 डिसेंबर रोजी बुध सुद्धा विश्वांतरी दशेत भ्रमण करत आहे, तो ज्येष्ठ नक्षत्राचा स्वामी आहे.
हेही वाचा>>
Author: VS NEWS DESK
pradeep blr