India vs Pakistan Cricket Match 30 November : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेवरुन जोरदार खेचाखेची पाहायला मिळत आहे. बीसीसीआय आणि पीसीबी दोन्ही क्रिकेट बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशात आता क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी हे अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत आमनेसामने भिडणार आहेत. अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेला 29 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी असन 15 सामने होणार आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकमेकांविरूद्धच्या सामन्याने या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात करणार आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान सामन्याबाबत सर्वकाही जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला हा शनिवारी 30 नोव्हेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 10 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर कुठे बघता येईल?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.
टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबला
अंडर 19 आशिया कप 2024 साठी टीम इंडिया : मोहम्मद अमान (कॅप्टन), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, किरण चोरमले , प्रणव पंत, हार्दिक राज, हरवंश सिंह पंगलिया (विकेटकीपर), अनुराग कावडे (विकेटकीपर), मोहम्मद एनान, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युद्धजीत गुहा, चेतन शर्मा आणि निखिल कुमार.
अंडर 19 आशिया कप 2024 साठी पाकिस्तान टीम: साद बेग (कॅप्टन आणि विकेटकीपर), मोहम्मद अहमद, हारून अरशद, तय्यब आरिफ, मोहम्मद हुजेफा, नवीद अहमद खान, हसन खान, शाहजेब खान, उस्मान खान, फहम-उल-हक, अली रजा, मोहम्मद रियाजुल्लाह, अब्दुल सुभान, फरहान यूसुफ आणि उमर जॅब.
Author: VS NEWS DESK
pradeep blr