Anil Ambani: अनिल अंबानी यांचा मोठा डाव, एका झटक्यात फेडले ₹12860000000 कर्ज

Anil Ambani Reliance Power Company: सासन पॉवर लिमिटेडचे​कर्ज कमी होणे हे अनिल अंबानी यांच्यासाठी सकारात्मक लक्षण आहे. अनिल अंबानी समूह कंपन्यांचे कर्ज कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनेक मार्गाने पैसा ते उभा करत आहेत.

AnilAmbani Reliance Power Company: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांनी सर्वांना धक्का दिला आहे. त्यांच्या रिलायन्स पॉवर या कंपनीची उपकंपनी सासन पॉवरने एका झटक्यात 1286 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. त्यांनी ब्रिटनच्या आयआयएफसीएल या संस्थेचे 1286 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. हे कर्ज 31 डिसेंबर 2024 पर्यंत फेडण्याची हमी अनिल अंबानी यांनी दिली होती. अखेर त्यांनी ते करुन दाखवले. त्यानंतर रियायन्स पॉवरचे शेअर चांगलेच वधारले आहे. आता सासन पॉवर कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे.

सात राज्यांमध्ये वीज पुरवठा

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स पॉवर ही वीज उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीची उपकंपनी सासन पॉवरचे मध्य प्रदेशातील सासन येथे 3,960 मेगावॅटचा प्रकल्प आहे. ही जगातील सर्वात मोठी कोळसावर वीज उत्पादन करणारी कंपनी आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि नवी दिल्लीत या राज्यांना विजेचा पुरवठा करते. 1.54 रुपये या दराने ही कंपनी वीज पुरवठा करते. देशात हे सर्वात कमी दर आहे. 40 कोटींपेक्षा जास्त लोकांना वीज पुरवठा केला जातो.

सासन पॉवरची मोठी क्षमता

रिलायन्स पॉवर कंपनीने प्राधान्याच्या आधारावर इक्विटी-लिंक्ड वॉरंटद्वारे 1,525 कोटी रुपयांची रक्कम उभारली आहे. या भांडवलामुळे कंपनीला झपाट्याने वाढणाऱ्या अक्षय ऊर्जा बाजारपेठेतील वाढीच्या संधींचा फायदा उठवण्यास मदत होईल. कंपनीची क्षमता 5,300 मेगावॅट आहे. त्यातील 3,960 मेगावॅट क्षमता सासन पॉवरची आहे. रिलायन्स पॉवरची आणखी एक उपकंपनी रोजा पॉवरने सिंगापूरस्थित कर्जदार व्हर्डे पार्टनर्सला 850 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट केले होते.

सासन पॉवर लिमिटेडचे ​कर्ज कमी होणे हे अनिल अंबानी यांच्यासाठी सकारात्मक लक्षण आहे. अनिल अंबानी समूह कंपन्यांचे कर्ज कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनेक मार्गाने पैसा ते उभा करत आहेत. रियायन्स पॉवरकडून आलेल्या या सकारात्मक बातम्यांमुळे 1 जानेवरी 2025 रोजी रियायन्स पॉवरच्या शेअर अपर सर्किटवर होते.

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು