मिशन मुंबई महानगर पालिका निवडणूक: ठाकरे गटाच्या आढावा बैठका 7 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. मध्यंतरी काही बैठका स्थगित झाल्या होत्या. आता उर्वरित बैठकांचा सिलसिला पुन्हा सुरु होत आहे.

महायुतीचे सरकार विक्रमी बहुमत मिळून स्थानापन्न झाले आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकीतील यश विधानसभा निवडणूकीत राखता आलेले नाही. आता महायुतीतील उद्धव ठाकरे गटाने आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीची तयारी जोरदार सुरु केली आहे. आगामी मुंबई महानगर पालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मुंबईतील 36 विधानसभा मतदार संघाचा आढावा घेत आहेत. मध्यंतरी काही कारणासाठी रद्द झालेल्या बैठकांचा सिलसिला पुन्हा सुरु होत आहे. ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या उर्वरित बैठका 7 जानेवारीपासून सुरु होत आहेत.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती. त्यानंतर उर्वरित बैठकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. उर्वरित बैठका आता 7, 8 आणि 9 जानेवारी रोजी होणार आहेत. महानगर पालिका निवडणकीच्या रणनितीसाठी पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती. त्यानंतर या निरीक्षकांनी आपला अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 तारखेच्या बैठकीत सादर केला होता.

आगामी मुंबई महानगर पालिका ठाकरे गटाने स्वबळावर लढावी असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे यासाठी उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी हितगुज करणार आहेत. या बैठकीसाठी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात येणार आहे

मातोश्रीवर झालेल्या पदाधिकारी आढावा बैठका

26 डिसेंबर – बोरिवली विधानसभा , दहिसर विधानसभा , मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा

27 डिसेंबर -अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली

नवीन वर्षात मातोश्रीवर होणाऱ्या बैठका

7 जानेवारी

घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, शिवाजीनगर मानखुर्द आणि कलिना

अनुशक्तीनगर, चेंबूर आणि सायन कोळीवाडा

8 जानेवारी

मुलुंड, विक्रोळी, भांडुप, कुर्ला धारावी, वडाळा, माहीम

9 जानेवारी

वरळी, शिवडी, भायखळा मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು