दोन मराठमोळ्या कलाकारांनी ९०च्या दशकात न्यूड फोटोशूट करून सर्वांचे लक्ष वेधले होते. या फोटोंमुळे त्यांच्या विरोधात जवळपास १४ वर्षे खटला सुरु होता.
आजकाल आपण अनेक कलाकारांनी केलेले न्यूड फोटोशूट पाहातो. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री स्वमिंगसूट देखील घालायला घाबरायच्या तेव्हा दोन मराठमोळ्या कलाकारांनी डेरिंग केली होती. या दोन कलाकरांनी ९०च्या दशकात न्यूड फोटोशूट केले होते. ते पाहून संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. आजकाल ओटीटीमुळे न्यूडीटी हा विषय अगदी नॉर्मलाइज झाला आहे. मात्र, ९०च्या काळात बोल्ड कपडे घालणे देखील वादाचा विषय ठरत होता. यादरम्यान अशीच एक जाहिरात वादग्रस्त ठरली ती म्हणजे मराठमोळे मॉडेल मिलिंद सोमन आणि मधू सप्रे यांची एक प्रिंट जाहिरात.
जेव्हा मधु सप्रे आणि मिलिंद सोमण यांचा हा फोटो काही मॅगझीनमध्ये छापण्यात आला तेव्हा संपूर्ण देशात खळबळ मजाली होती. कारण, या फोटोमध्ये त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्यांनी केवळ पायामध्ये शूज घातले होते. दोघेही न्यूड होत. ते दोघे एकमेंकांना चिटकून उभे होते तसेच त्यांच्या गळ्यात अजगर हा साप होता.
मधु सप्रे आणि मिलिंद सोमण यांचा फोटोपाहून नेक संघटना आणि राजकीय पक्षांकडून अश्लीलतेचा आरोप करण्यात आला होता. तसेच इतर तक्रारीनंतर या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली होती. दोन्ही मॉडेल्सवर महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व कायदा, 1986 चे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. शिवाय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत, मोहिमेमागील एजन्सी ॲम्बियन्स ॲडव्हर्टायझिंग विरुद्ध प्राणी हक्क गटाने एक खटला दाखल केला. जवळपास १४ वर्षे ही कायदेशीर लढाई सुरु होती. अखेर २००९मध्ये या खटल्याचा निकाल लागला होता. सोमण आणि सप्रे यांच्यासह इतर सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.