महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजपने शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का दिला आहे. जळगावच्या एरंडोलमधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केले आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आता सध्या सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच अनेक दिग्गज नेते, आजी माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात प्रवेश घेत आहे. नुकतंच शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर सुरु आहे. तर भाजपकडून विरोधी कार्यकर्त्यांना वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता नुकतंच भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
जळगावच्या एरंडोलमधील तीन माजी नगराध्यक्ष, पंचायत समितीचे दोन माजी सभापतींसही इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये सहभागी झाले. मुंबईतील भाजप कार्यालयात मंत्री गिरीश महाजन, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
जळगावातील राजकीय समीकरण बदलणार
तसेच एरंडोल विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवणारे भगवान महाजन यांनाही भाजपमध्ये प्रवेश घेतला. उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेनंतर ठाकरे गटातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तालुक्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर
दरम्यान शिवसेना शिंदे गटाने संपूर्ण महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. नुकतंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजी नगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह मुंबईतील तीन माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने कोकणात आणि छत्रपती संभाजी नगरात उबाठा गटाला खिंडार पडले.
तसेच मुंबईतील भांडुपचे माजी नगरसेवक उमेश पाटील, चेंबूरच्या माजी नगरसेविका अंजली नाईक आणि गोरेगाव येथील माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखप्रमुख, महिला सेना आणि शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
संभाजीनगरमधील वैजापूर, गंगापूर मतदार संघात आमदार रमेश बोरनारे यांच्या पुढाकारे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबीर खान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर बापू पवार, मा. जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल, माजी पंचायच समिती सभापती-राजू मगर, डॉ.राजू डोंगरे, राम हरी जाधवे, बाबासाहेब जगताप यांनीही शिवसेनेत प्रवेश घेतला.