Toll Rates Increased on Samruddhi Mahamarg: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी एक्सप्रेस असे नाव दिले. या मार्गाचा पहिला टप्पा 11 डिसेंबर 2022 ला सुरु झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी असा 520 किमी मार्गाचे उद्घाटन केले होते.
Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असणारा समृद्धी महामार्ग अजून पूर्ण झाला नाही. या महामार्गाचा शेवटचा टप्पा अजून राहिला आहे. परंतु महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना झटका बसणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ( एमएसआरडीसी ) येत्या 1 एप्रिलपासून महामार्गावरील टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ तब्बल 19 टक्के करण्यात आली आहे. तीन वर्षांसाठी ही वाढ केल्यामुळे आता पुढील महिन्यांपासून वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
तीन वर्षांसाठी असणार नवीन दर
- समृद्धी महामार्गात आता केलेली 19 टक्के दरवाढ ही तीन वर्ष स्थिर राहणार आहे. त्यानंतर पुन्हा आढावा घेऊन दरवाढ केली आहे. आता पुढील तीन वर्षासाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत हे दर लागू राहतील, असे एमएसआरडीसीने कळवले आहे.
- नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार, हलकी मोटर यांना सध्या 1080 रुपयांचा टोल लागायचा मात्र नव्या दरानुसार 1,290 रुपये लागतील
- हलकी व्यावसायिक, मिनीबस सध्या 1745 टोल होतो. तो नवीन वरवाढीनुसार 2075 रुपये करण्यात आला.
- बस किंवा दोन आसाचा ट्रकासाठी आतापर्यंत 3655 रुपये लागत होते. आता नवीन दर 4355 रुपये असणार आहे.
- अति अवजड वाहनांना जुने दर 6980 होते. नवे दर 8315 रुपये असणार आहे.
असा सुरु झाला मार्ग
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी एक्सप्रेस असे नाव दिले. या मार्गाचा पहिला टप्पा 11 डिसेंबर 2022 ला सुरु झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी असा 520 किमी मार्गाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी ते भरवीर असा 105 किमीचा मार्गाचे उद्घघाटन केले होते. 23 मे 2023 पासून हा दुसरा टप्पा सुरु झाला होता. त्यानंतर तिसरा टप्पा 4 मार्च 2024 रोजी भरवीर ते इगतपुरी दरम्यान सुरु झाला. आता शेवटचा 76 किमीचा टप्पा महिन्याभरात सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.