MARATHY – Vijayasangharsha news https://vsnewskannada.com news in kannada Fri, 21 Mar 2025 10:01:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://vsnewskannada.com/wp-content/uploads/2024/02/22-150x150.jpg MARATHY – Vijayasangharsha news https://vsnewskannada.com 32 32 Ramgiri Maharaj : औरंगजेबाच्या कबरीचा वाद, प्रसिद्ध महंत रामगिरी महाराजांची पहिली प्रतिक्रिया https://vsnewskannada.com/archives/43612 https://vsnewskannada.com/archives/43612#respond Fri, 21 Mar 2025 10:01:55 +0000 https://www.vsnewskannada.com/?p=43612 Ramgiri Maharaj : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात सुरु असलेल्या वादात प्रसिद्ध महंत रामगिरी महाराज यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘नागपूरमध्ये एवढे दगड आले कुठून ?’ असा प्रश्न रामगिरी महाराजांनी उपस्थित केला.

सध्या राज्यामध्ये औरंगजेबाची कबर काढण्यावरून मोठा वाद सुरू असलेला पाहायला मिळत आहे. यावर बोलताना महंत रामगिरी महाराज यांनी अशा प्रकारच्या कबरी नकोय असं म्हटलं आहे. “औरंगजेब आक्रांत होता, तो काही भारतीय नव्हता, अशा प्रकारच्या आक्रांत लोकांना आदर्श मानून आराजकता पसरवण्याचे कामे होतात” असं रामगिरी महाराज म्हणाले. “ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून अमेरिकेने ठार मारले. पण त्याच्या कबरीला जागा मिळू दिली नाही. असे आक्रांत लोक कबरीत गेले तर लोक त्याला आदर्श मानतात आणि अराजकता माजवतात त्यामुळे अशा लोकांच्या कबरी नकोत” असं महंत रामगिरी महाराज यांनी म्हटलय. ‘औरंगजेबाची कबर काढणं न काढणं हा सरकारचा विषय आहे’ असंही रामगिरी महाराज म्हणाले.

औरंगजेबाची कबर काढणं हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे, यावर बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की “ज्या नावाने जेव्हा अराजकता वाढते, त्यावेळी असे प्रश्न निर्माण होतात, म्हणून हिंदुत्ववादी संघटनेने हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याला काही कारण आहे, जसं नागपूरमध्ये दंगल झाली ती अराजक तत्त्वाने केली आहे. हे ठरवून झालेलं आहे” ‘नागपूरमध्ये एवढे दगड आले कुठून ?’ असा प्रश्न रामगिरी महाराजांनी उपस्थित केला. “या अराजक लोकांना आदर्श मानून काही लोक असे प्रकार करतात आणि दंगली घडतात” असं मतं रामगिरी महाराजांनी व्यक्त केलंय.

नितेश राणेंवर काय म्हणाले?

मंत्री नितेश राणे हे वेळोवेळी भाषणांमधून मुस्लिम धर्माविरोधात टोकाचे वक्तव्य करतात, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान टोचले अशा बातम्या समोर आल्या होत्या. यावर बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की, “कुणी कुणाच्या धर्माविषयी बोलणं हा विषय वेगळा आहे. धर्माबद्दल बोलण्याऐवजी त्या धर्मामध्ये जी अराजक तत्व असतात, त्यांच्याविषयी बोलणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक धर्मात चांगले वाईट लोक असतात. पण धर्माच्या नावाखाली कोणी अराजकता निर्माण करत असेल तर त्याला विरोध करणं गरजेचंच असत” असं रामगिरी म्हणाले.

]]>
https://vsnewskannada.com/archives/43612/feed 0
पुणे आगीत चौघांचा मृत्यू प्रकरणात टेम्पो मालकाने पोलिसांना दिली महत्वाची माहिती, चालकाच्या आरोपावर म्हणाले… https://vsnewskannada.com/archives/43609 https://vsnewskannada.com/archives/43609#respond Fri, 21 Mar 2025 10:00:55 +0000 https://www.vsnewskannada.com/?p=43609 Pune Hinjawadi Mini Bus Fire: बस दुर्घटनेचा आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरु शकलो नाही. काही कर्मचारी १९८५ पासून कार्यरत होते. सर्व कर्मचारी आम्ही एका परिवारासारखे राहत होतो.

Pune Mini Bus Fire: पुणे शहरातील हिंजवाडीत बुधवारी मोठी दुर्घटना घडली होती. व्योम ग्राफिक्स या आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला (टेम्पो) आग लागली होती. या आगीत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना अपघात असल्याचे म्हटले जात होते. परंतु पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बस चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच टेम्पोला आग लावल्याचे समोर आले. त्याने त्यासंदर्भात पोलिसांकडे कबुलीजबाब दिला. त्यात मालकाने पगार थकवल्याच्या रागातून ही घटना घडली. त्यामुळे पोलीस चौकशीसाठी व्युमा ग्राफिक्स कंपनीचे मालक नितेन शाह यांच्यापर्यंत पोहचले. शाह यांनी पोलिसांना जनार्दन हंबर्डीकर याचा पगार थकला नसल्याचे सांगितले.

काय म्हणाले कंपनीचे मालक?

व्युमा ग्राफिक्स कंपनीचे मालक नितेन शाह माध्यमांशी बोलताना म्हणाले, बस दुर्घटनेचा आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरु शकलो नाही. काही कर्मचारी १९८५ पासून कार्यरत होते. सर्व कर्मचारी आम्ही एका परिवारासारखे राहत होतो. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना वैद्यकीय मदत करत आहोत. जनार्दन हंबर्डीकर याचा पगार थकलेला नव्हता. त्याला त्याला वेळेवर पगार दिलेला आहे. त्याचा एक रुपयांचा ही पगार थकवला नाही, असा खुलासा मालक नितेन शाह यांनी केला.

बेंझिनची चोरी बाबत काय म्हणाले…

कंपनीतून बेंझिनची चोरी झाल्याबाबत शाह यांना प्रश्न विचारला. एक लिटर की पाच लिटर बेंझिन चोरीला गेले? असे त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, याबाबत मला कल्पना नाही. या प्रकरणात पोलीस चौकशी सुरु आहे. मी अधिक काही बोलू शकत नाही. तुम्ही पोलिसांना विचारा, असे सांगत मालक नितेश शाह यांनी काढता पाय घेतला.

अशी घडली होती दुर्घटना

पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स या आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने मिनी बस लावली होती. या मिनी बसमधून बुधवारी 12 कर्मचारी जात होते. त्यावेळी चालक जनार्दन हंबर्डीकर यांनी रागातून बेंझिन टाकून मिनी बसला आग लागली. त्याची तयारी त्याने एका दिवसापूर्वीच केली होती. या दुर्घटनेत सुभाष भोसले, (वय 42), शंकर शिंदे ( वय 60), गुरुदास लोकरे ( वय 40) आणि राजू चव्हाण (वय 40) या चौघांचा मृत्यू झाला होता.

]]>
https://vsnewskannada.com/archives/43609/feed 0
नागपूरच्या राड्याला जबाबदार कोण?; विकी कौशल आणि नितेश राणेंचं नाव घेत अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत https://vsnewskannada.com/archives/43606 https://vsnewskannada.com/archives/43606#respond Fri, 21 Mar 2025 09:59:36 +0000 https://www.vsnewskannada.com/?p=43606 सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आहे. त्याने या पोस्टमध्ये नागपूरमध्ये झालेल्या राड्याला कोण जबाबदार आहे याविषयी वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादाला १७ मार्च रोजी हिंसक वळण आले. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री याच मुद्यावरुन दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड, वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले. अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दगडफेक करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना पोलीसही जखमी झाले. दगडफेकीच्या घटनेत 8 ते 10 पोलीस जखमी झाले. आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले. औरंगजेबच्या कबरीचा वाद हा ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सुरु झाला. आता यावर एका अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत आहे.

बिग बॉस १३मध्ये सहभागी झालेला अभिनेता आणि राजकीय विश्लेषक तहसीन पूनावालाने ट्विटरवर ‘या सगळ्याला विकी कौशल नाही तर थर्ड ग्रेड अभिनेत्री जबाबदार आहे’ अशी टिप्पणी केली. आता हा अभिनेता नेमकं काय म्हणाला जाणून घ्या…

‘ज्याने छावासारखा ब्लॉकबस्टर हिट सिनेमा दिला आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली त्या अभिनेत्याला, विकी कौशलला नागपूरमधील राड्यासाठी जबाबदार धरण्यात येत आहे. हे फारच खेदजनक आहे. एखादी कला मग ते सिनेमा असो, पुस्तक असो किंवा सर्जनशीलता असो त्याच्यात दंगल भडकावण्याची ताकद नसते. ही कला फक्त समाजाला आरखा दाखवून देऊ शकते ना की आग पेटवू शकते. जर सिनेमात प्रॉब्लम असेल तर तो पाहू नका किंवा चांगला बनवण्याचा प्रयत्न करा, कोणाला पुस्तक आवडलं नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करा किंवा याहून अधिक चांगली कथा लिहा’ असे अभिनेता म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘हिंसा करणे हा कोणाचाही अधिकार नाही. या सगळ्यामागचा खरा गुन्हेगार हा अबु आजमी आणि तिसऱ्या दर्जाची अभिनेत्री आहे. त्यांनीच केवळ उजव्या विचारसणीच्या लोकांना विरोध करायचा म्हणून औरंगजेबाचा उदो उदो केला. इतकच नाही तर महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे आणि तेलंगणाचे आमदार टी राजा यांनीही आगीत तेल ओतले. तुम्ही लक्षात घ्या, आजमींचे, नितेश राणेंचे आणि टी राजांची मुले या दंगलीत रस्त्यावर नव्हती. कारण विशेषाधिकार असलेल्या या लोकांनी अराजकता निर्माण केली आणि याचा त्रास गरिबांना सहन करावा लागला. हा द्वेष पसरवणे थांबूया. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंदचा नारा देऊया. रमजानच्या या महिन्यात एकमेकांनाच आपले कुटुंब समजून एकत्र येऊन आलिंगन देऊया. भारत अविभाजितरित्या विकास करो आणि समृद्ध होवो.’

]]>
https://vsnewskannada.com/archives/43606/feed 0
दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा? https://vsnewskannada.com/archives/43603 https://vsnewskannada.com/archives/43603#respond Fri, 21 Mar 2025 09:58:08 +0000 https://www.vsnewskannada.com/?p=43603 Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: ‘दिशाच्या मृत्यूनंतर घाबरलो, पोलिसांनी माझे कपडे काढले आणि…’, दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा ‘तो’ धक्कादायक खुलासा…, पुन्हा दिशा प्रकरण चर्चेत…

Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियन हिना 2020 मध्ये 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि सर्वत्र खळबळ माजली. दिशाच्या मृत्यूनंतर 14 जून 2020 मध्ये सुशांत याने देखील स्वतःला संपवलं. दिशाच्या मृत्यूनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहन राय याने मोठा खुलासा केला होता. दिशाच्या मृत्यू पूर्वी आणि मृत्यूनंतर नक्की काय झालं यावर रोहन याने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

रिपोर्टनुसार, दिशा सालियन मॉडेल आणि अभिनेता रोहन राय याच्यासोबत लग्न करणार होती. पण लग्नाच्या काही दिवस आधीच दिशाचा मलाड येथील उच्चभ्रू इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडल्यामुळे दिशाचा मृत्यू झाला. दरम्यान, दिशाच्या मृत्यूनंतर रोहन याला अनेक धमक्या देखील देण्यात आल्या.

त्या रात्री नक्की काय झालं?

रोहन म्हणाला, ‘दिशा प्रचंड संवेदनशील मुलगी होती. आम्ही दोघे कुटुंबासोबत राहत होतो. 4 जून रोजी मी तिला सांगितलं, की आपण मलाड येथील घरी जाऊ… दिशाला चांगलं वाटावं…म्हणून मी तिला मलाड येथील आमच्या फ्लॉटवर घेवून गेलो. आमच्यासोबत चार मित्र देखील होते. त्यादिवशी आम्ही मोठ्या प्रमाणात ड्रिंक केली होती. नंतर मी माझ्या एका मित्रासोबत फोनवर बोलायला गेलो आणि दिशा बेडरुममध्ये गेली.’

‘खूप वेळ लोटल्यानंतर देखील ती परत आली नाही. त्यामुळे आम्ही तिला शोधू लागलो. तेव्हा मी पाहिलं बेडरुमची खिडकी उघडी होती. खिडकीतून खाली पाहिल्यानंतर मला तिचे कपडे दिसले. मी पूर्णपणे घाबरलेलो… मी देखील स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. ती रात्र एका वाईट स्वप्नासारखी होती. दिशा आणि मी जवळपास 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो…’ असं देखील रोहन म्हणाला.

पोलिसांनी माझे कपडे काढले – रोहन राय

दिशाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मला अनेक धमक्या येवू लागल्या. लोकं मला शिव्या देऊ लागले. दिशाच्या आत्महत्येच्यानंतर आमच्यात काही भांडण झालं होतं का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी माझे कपडेही काढायला लावले… असं देखील रोहन राय म्हणाला होता. आता दिशा सानियल मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे

]]>
https://vsnewskannada.com/archives/43603/feed 0
समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यापूर्वी मोठी टोलवाढ, सुसाट प्रवास महागणार, जाणून घ्या कोणत्या वाहनांना किती टोल? https://vsnewskannada.com/archives/43600 https://vsnewskannada.com/archives/43600#respond Fri, 21 Mar 2025 09:56:56 +0000 https://www.vsnewskannada.com/?p=43600 Toll Rates Increased on Samruddhi Mahamarg: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी एक्सप्रेस असे नाव दिले. या मार्गाचा पहिला टप्पा 11 डिसेंबर 2022 ला सुरु झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी असा 520 किमी मार्गाचे उद्घाटन केले होते.

Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असणारा समृद्धी महामार्ग अजून पूर्ण झाला नाही. या महामार्गाचा शेवटचा टप्पा अजून राहिला आहे. परंतु महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना झटका बसणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ( एमएसआरडीसी ) येत्या 1 एप्रिलपासून महामार्गावरील टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ तब्बल 19 टक्के करण्यात आली आहे. तीन वर्षांसाठी ही वाढ केल्यामुळे आता पुढील महिन्यांपासून वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. 701 किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. आता येत्या महिन्याभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्ग सुरु होणार आहे. मात्र संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच एमएसआरडीसीने टोलमध्ये मोठी वाढ केली आहे. नवी टोलवाढ येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.

तीन वर्षांसाठी असणार नवीन दर

  • समृद्धी महामार्गात आता केलेली 19 टक्के दरवाढ ही तीन वर्ष स्थिर राहणार आहे. त्यानंतर पुन्हा आढावा घेऊन दरवाढ केली आहे. आता पुढील तीन वर्षासाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत हे दर लागू राहतील, असे एमएसआरडीसीने कळवले आहे.
  • नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार, हलकी मोटर यांना सध्या 1080 रुपयांचा टोल लागायचा मात्र नव्या दरानुसार 1,290 रुपये लागतील
  • हलकी व्यावसायिक, मिनीबस सध्या 1745 टोल होतो. तो नवीन वरवाढीनुसार 2075 रुपये करण्यात आला.
  • बस किंवा दोन आसाचा ट्रकासाठी आतापर्यंत 3655 रुपये लागत होते. आता नवीन दर 4355 रुपये असणार आहे.
  • अति अवजड वाहनांना जुने दर 6980 होते. नवे दर 8315 रुपये असणार आहे.

असा सुरु झाला मार्ग

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी एक्सप्रेस असे नाव दिले. या मार्गाचा पहिला टप्पा 11 डिसेंबर 2022 ला सुरु झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी असा 520 किमी मार्गाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी ते भरवीर असा 105 किमीचा मार्गाचे उद्घघाटन केले होते. 23 मे 2023 पासून हा दुसरा टप्पा सुरु झाला होता. त्यानंतर तिसरा टप्पा 4 मार्च 2024 रोजी भरवीर ते इगतपुरी दरम्यान सुरु झाला. आता शेवटचा 76 किमीचा टप्पा महिन्याभरात सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.

]]>
https://vsnewskannada.com/archives/43600/feed 0
वा ! चित्राताई वाघ वा…बाळासाहेब असते तर… नारायण राणे यांचं ट्विट काय? https://vsnewskannada.com/archives/43597 https://vsnewskannada.com/archives/43597#respond Fri, 21 Mar 2025 09:55:22 +0000 https://www.vsnewskannada.com/?p=43597 दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात नवीन वळण आले आहे. तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करत याचिका दाखल केली आहे. यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तब्बल ५ वर्षांनी तिचे वडील सतीश सालियन यांनी कोर्टात धाव घेतली आहे. दिशाच्या मृत्यूप्रकरणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरुन विधानसभेसह विधानसभेतही मोठा गदारोळ झाला. दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली. एसआयटी स्थापन केली आहे, तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत चित्रा वाघ यांचे कौतुक केले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी चित्रा वाघ यांनी सभागृहात मांडलेल्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. आता नारायण राणे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.

नारायण राणेंचे ट्वीट

वा! चित्राताई वाघ वा! छत्रपती शिवरायांच्या 15 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाट्यावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांचीही तुम्ही चिंधड्या उडविल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता. लगे रहो चित्राताई!, असे नारायण राणे म्हणाले.

चित्रा वाघ यांची कमेंट काय?

नारायण  राणे यांच्या ट्वीटवर आता चित्रा वाघ यांनीही कमेंट केली आहे. धन्यवाद राणे साहेब…..उसूलों पे जहाँ आँच आये टकराना ज़रूरी है. जो ज़िन्दा हों तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है. मी सत्यासाठी… न्यायासाठी… अशीच लढत राहीन आणि जेव्हा तुमच्या सारखे ज्येष्ठ नेते पाठीशी उभे राहतात तेव्हा लढण्याची ताकद आणखीनच दुणावते… पुनःश्च धन्यवाद नारायण राणे साहेब, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान चित्रा वाघ यांनी काल सभागृहात जोरदार भाषण केले. “दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली. एसआयटी स्थापन केली आहे, तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे. त्याच्यावर संजय राठोड यांचा विषय घेण्यात आला. मी जे करायचं होतं ते केलं. मला जे दिसलं जे पुरावे आले, त्यावर मी लढले. तुम्ही तोंड शिवून बसला होता. मला विचारता ते कसे मंत्रिमंडळात आले, असं मला विचारता”, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.

]]>
https://vsnewskannada.com/archives/43597/feed 0
MPSC परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आयोगासंदर्भात म्हणाले… https://vsnewskannada.com/archives/43327 https://vsnewskannada.com/archives/43327#respond Thu, 20 Mar 2025 02:11:57 +0000 https://www.vsnewskannada.com/?p=43327 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १२ नोव्हेंबर २०२४ च्या पत्रान्वये ६१७ उमेदवाराची शासनास शिफारस केली होती. त्यातील कागदपत्रे तपासणीसाठी हजर ५४० उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्य सरकारच्या विविध पदांची भरती केली जाते. सरकारी अधिकारी होण्यासाठी राज्यभरातील युवक प्रयत्न करत असतात. वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. आयोगाने राज्यातील परीक्षेचा पॅटर्न यावर्षापासून बदलला आहे. आता एमपीएससीची परीक्षा यूपीएससीप्रमाणे होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच या परीक्षेसंदर्भात इतर महत्वाची माहिती त्यांनी सभागृहात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिली.

संपूर्ण वेळापत्रक तयार करणार

सन २०२५ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येईल. तसेच या स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसार त्या घेतल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद आमदार शिवाजीराव गर्जे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

 

यूपीएससीची तयारी होणार

महाराष्ट्रातील विद्यार्थी हा यूपीएससी सोबत एमपीएससीची परीक्षा देत असतो. दोन्ही परीक्षेचा पॅटर्न वेगळा असल्याने तो आता एकसमान करण्यात येत आहे. त्याचबरोबर एमपीएससीला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे सुधारित आकृतीबंधाद्वारे मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढे वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ ची पदभरती अधिक गतीने करण्यासाठी आयोगाची पुनर्रचना केली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

५४० उमेदवारांना नियुक्ती आदेश

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १२ नोव्हेंबर २०२४ च्या पत्रान्वये ६१७ उमेदवाराची शासनास शिफारस केली होती. त्यातील कागदपत्रे तपासणीसाठी हजर ५४० उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात मोठ्या प्रमाणात भर्ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तसेच यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करून ‘एमपीएससी’च्या पुनर्रचनेचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

]]>
https://vsnewskannada.com/archives/43327/feed 0
IPL 2025 : रवींद्र जडेजा मोठा विक्रम करण्यासाठी सज्ज, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच ऑलराउंडर ठरणार https://vsnewskannada.com/archives/43324 https://vsnewskannada.com/archives/43324#respond Thu, 20 Mar 2025 02:09:26 +0000 https://www.vsnewskannada.com/?p=43324  चेन्नईचा स्टार आणि अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजाकडे आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात मुंबईविरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. जाणून घ्या.

चेन्नईचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा आयपीएलच्या आगामी 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) जोरदार तयारी करत आहे. या हंगामातील पहिल्याच सामन्यात गतविजेता कोलकाता विरुद्ध बंगळुरु एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. हा सामना 22 मार्चला कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर चेन्नई आणि मुंबई हे दोन्ही यशस्वी संघ एकमेकांविरुद्ध 23 मार्चला आपल्या मोहिमेतील पहिला सामना खेळणार आहेत. या सामन्यात ऑलराउंडर रवींद्र जडेजाकडे मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जडेजाला कोणता विक्रम करण्याची संधी आहे? हे जाणून घेऊयात.

पुणेकर ऋतुराज गायकवाड हा चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. जडेजाचा खेळाडू म्हणून यंदाचा आयपीएलचा 12 वा हंगाम असणार आहे. जडेजाकडे आयपीएल स्पर्धेत 3 हजार धावा आणि 150 विकेट्स घेणारा पहिलावहिला ऑलराउंडर होण्याची संधी आहे. जडेजाला हा विक्रम करण्यासाठी फक्त काही धावांचीच गरज आहे. जडेजाने याआधीच 150 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांचं जडेजाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

रवींद्र जडेजाची आयपीएल कारकीर्द

जडेजाने 2008 साली राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केलं. जडेजाने तेव्हापासून ते 17 व्या मोसमापर्यंत 240 सामने खेळले आहेत. जडेजाने 240 सामन्यांमधील 184 डावांमध्ये 2 हजार 959 धावा केल्या आहेत. त्यामुळे जडेजा 3 हजारांपासून फक्त 41 धावा दूर आहे. जडेजाने आयपीएलमध्ये 3 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच जडेजाने 215 चौकार आणि 107 षटकार लगावले आहेत.

बॉलिंग रेकॉर्ड

जडेजाने 240 सामन्यांमधील 211 डावात 7.62 च्या इकॉनॉमीने 160 विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने एकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाची 16 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

‘सर’ रवींद्र जडेजा

चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, मथीशा पथिराणा, शिवम दुबे, आर अश्विन, डेवन कॉन्वहे, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुड्डा, गुरजपनीत सिंह, नाथन एलिस, जेमी ओवर्टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ, वंश बेदी आणि श्रेयस गोपाळ.

]]>
https://vsnewskannada.com/archives/43324/feed 0
नाशिक हादरलं, आंबेडकरवाडीत दोन सख्ख्या भावांचा खून, एक अजित पवार गटाचा शहर उपाध्यक्ष https://vsnewskannada.com/archives/43321 https://vsnewskannada.com/archives/43321#respond Thu, 20 Mar 2025 02:08:03 +0000 https://www.vsnewskannada.com/?p=43321 नाशिक शहरात मागच्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या, राडे अशा घटना सातत्याने घडत आहेत. आता पुन्हा एकदा नाशिक हत्येच्या घटनेमुळे हादरलं आहे. नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे.

नाशिकला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. नाशिक उपनगर परिसरात असलेल्या आंबेडकर वाडी येथे दोन सख्ख्या भावांचा खून झाला आहे. उमेश ऊर्फ मुन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. उमेश ऊर्फ मुन्ना जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे.

दोन बंधुंची हत्या करून हल्लेखोर फरार झाला आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीच वातावरण आहे. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरू झाला आहे. नाशिक शहरात मागच्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या, राडे अशा घटना सातत्याने घडत आहेत.

राजकीय वैमनस्यातून हत्या का?

आंबेडकरवाडी परिसरात काल रात्रीच्या सुमारास हा गुन्हा घडला. मृत पावलेल्या दोघांपैकी एक भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहरउपाध्यक्ष आहे. या हत्यांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या तुकड्या रवाना झाल्या आहेत. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली की, आणखी काही कारण यामागे आहे, ते लवकरच स्पष्ट होईल.

]]>
https://vsnewskannada.com/archives/43321/feed 0
जयंत पाटलांचा ‘तो’ प्रश्न, फडणवीसांचं उत्तर; नितेश राणेंना नेमका काय दिला सल्ला? https://vsnewskannada.com/archives/43318 https://vsnewskannada.com/archives/43318#respond Thu, 20 Mar 2025 02:07:00 +0000 https://www.vsnewskannada.com/?p=43318 मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे, ज्याचा उल्लेख आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी केला होता. मंत्री म्हणून आपल्याला राज धर्म पाळायचा असतो, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आज एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल फडणवीस यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना संयम  बाळगण्याचा सल्ला दिला आहे. ‘तुम्ही मंत्री आहात तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे’ असं फडणीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?  

मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे, ज्याचा उल्लेख आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी केला होता. मंत्री म्हणून आपल्याला राज धर्म पाळायचा असतो. त्यामुळे आपले विचार काय आहेत, आपल्याला काय आवडतं? काय आवडत नाही? हे बाजूला ठेवून आपण संविधानाची शपथ घेतली आहे. संविधानाने आपल्यावर कोणासोबतही अन्याय न करता वागण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. कधी-कधी तरुण मंत्री बोलून जातात. त्यांच्याशी मी संवाद करतो, त्यांना मी सांगतो. की आता तुम्ही मंत्री आहात तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे. असं उत्तर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या प्रश्नाला दिलं आहे. ते लोकमतने आयोजित केलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

दरम्यान त्यापूर्वी नागपूर राड्यावरून विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी कडक इशारा दिला आहे. ज्या चादरीवरून हा वाद झाला त्या चादरीवर पवित्र कुरानाची कोणतीही आयत नव्हती. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना माफी नाही, पोलिसांवर हल्ला करणारे जर कबरीत लपले असतील तर आम्ही त्यांना कबरीतून शोधून काढू, असा इशारा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.  नागपूर पूर्वीपासून शांत आहे, 1992 ला साप्रदायिक तणाव निर्माण झाला त्यावेळी देखील नागपूर शांतच होतं. मात्र यावेळी काही जणांनी जाणीवपूर्वक चुकीचे मेसेज व्हायरल केले, त्यामुळे हे सर्व घडलं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

]]>
https://vsnewskannada.com/archives/43318/feed 0